दोन दिवसात दोन घोटाळे, पार्थ पवारांचा डबल धमाका; कोरेगावनंतर बोपोडी प्रकरण चव्हाट्यावर

Last Updated:

बोपोडीतील कृषीविभागाची १५ एकर सरकारी जमीन हडपल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय.

News18
News18
पुणे :  उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारच्या १८०० कोटींच्या जमीनीच्या गैरव्यवहारानं राजकीय भूकंप आलाय. त्याचे हादरे कमी होत नाहीत तोच आणखी एक जमीन घोटाळा समोर आला असून बोपोडीतील कृषीविभागाची १५ एकर सरकारी जमीन हडपल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय. या मुद्द्यावरून विरोधकांनी अजित पवारांना चांगलंच घेरलंय.
पार्थ पवार यांच्या घोटाळ्याचा दुसरा धमाका उजेडात आलाय. अमेडिया एलएलपीचा मुंढवा जमीन घोटाळा समोर आलेला असतानाच आता याच कंपनीनं केलेल्या जमीन घोटाळ्याचा दुसरा प्रताप समोर आलाय. राज्य सरकारच्या बोपोडीतील डेअरी विभागाची मालकी असलेल्या जमीनीवर खासगी इसमाचे नाव चढवून सरकारची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी तहसीलदार सुर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आलं होतं. मात्र आता या ही जमिनीची खरेदी पार्थ पवार यांच्या अमेडिया एलएलपीकडून करण्यात आल्याचं उघड झालंय. त्यामुळे खडक पोलिसांकडे दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे विरोधकांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतलाय.
advertisement

बोपोडीतील सरकारी जमीन घोटाळ्याचं प्रकरण नेमकं काय आहे?

15 एकर जमीन कृषी विभागाच्या ताब्यात होती. तहसीलदार येवलेंकडून त्यातील नावांमध्ये फेरफार करण्यात आला. हेमंत गावडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस, विद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटेंच्या नावे जमीन करण्यात आली. जमिनीचं कुलमुखत्यारपत्र शीतल तेजवाणीच्या नावे केलं. पार्थ पवारांच्या कंपनीनं तेजवाणींकडून जमीन खरेदी केली. जमिनीच्या ताब्यासाठी पार्थ पवारांच्या कंपनीचं पत्र देण्यात आलं. या प्रकरणी तहसीलदार येवलेंसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
advertisement
पार्थ पवारांचे सलग दोन जमीन घोटाळे राज्यासमोर आले आहेत. त्यामुळे विरोधकांना मोठा राजकीय मुद्दा मिळालाय. तर दुसरीकडे नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
दोन दिवसात दोन घोटाळे, पार्थ पवारांचा डबल धमाका; कोरेगावनंतर बोपोडी प्रकरण चव्हाट्यावर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement