advertisement

बायको अन् मुलीचा त्रास, बहिणीला शेवटचा VIDEO कॉल, पुण्यात वरिष्ठ अधिकाऱ्याने संपवलं जीवन

Last Updated:

पुण्यातील पर्वती परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केला आहे.

News18
News18
पुण्यातील पर्वती परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केला आहे. पत्नी आणि मुलगी सतत वाद घालते. याच त्रासाला कंटाळून संबंधित कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या बहिणीला व्हिडीओ कॉल केला होता. आपल्याला मायलेकीचा त्रास असल्याचं बहिणीला सांगितलं. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी मयताच्या पत्नीसह दोन मुलींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

आत्महत्या करणारी ५७ वर्षीय व्यक्ती मुंबईतील महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींसोबत कौटुंबिक कारणावरून वारंवार वाद होत होते. या सततच्या वादाला ते कंटाळले होते. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी त्यांनी आपल्या बहिणीला व्हिडिओ कॉल केला.
advertisement
कॉलवर बोलत असतानाच त्यांनी बहिणीला सांगितले की, "पत्नी आणि मुलींसोबत होणाऱ्या रोजच्या भांडणांमुळे आणि सततच्या त्रासामुळे मी आता आत्महत्या करत आहे." हे बोलून त्यांनी गळफास घेत आपलं जीवन संपवलं.

पत्नी आणि मुलींवर गुन्हा दाखल

या घटनेनंतर मृताच्या बहिणीने पोलिसांकडे धाव घेतली. सततच्या कौटुंबिक कलहामुळे आणि त्रासामुळेच भावाने आत्महत्या केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीच्या तक्रारीवरून संबंधित व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली त्यांची पत्नी आणि दोन मुलींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्वती पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
बायको अन् मुलीचा त्रास, बहिणीला शेवटचा VIDEO कॉल, पुण्यात वरिष्ठ अधिकाऱ्याने संपवलं जीवन
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement