पॅकिंग फूड की मांसाहार, कुत्र्याच्या स्वभावावरूनच ठरतो आहार, Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
श्वानाचा त्याच्या जातीनुसार स्वभाव भिन्न असतो. जातीनुसार श्वानाचे वजन, उंची ठरत असते. त्यावरूनच त्याचा आहार ठरवावा लागतो.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा हा सर्रास पाळला जाणारा प्राणी आहे. अनेकजण घराच्या संरक्षणासाठी आवर्जून श्वान पाळतात. परंतु, त्याच्या आहाराबाबत योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं. श्वानाच्या जातीवरून त्याचा आहार ठरतो. तसेच त्याच्या वजनानुसार आहार निश्चित केला जातो. याबाबत पुणे येथील डॉग फूड विक्रेते सागर देसले यांनी माहिती दिलीय.
advertisement
वजनावरून ठरतो आहार
श्वानाचा त्याच्या जातीनुसार स्वभाव भिन्न असतो. जातीनुसार श्वानाचे वजन, उंची ठरत असते. त्यावरूनच त्याचा आहार ठरवावा लागतो. सर्वसाधारण भारतीय श्वानाचं वजन 20 ते 35 किलोपर्यंत असतं. 10 किलोच्या आत मध्ये जर श्वानच वजन असेल तर त्याला टॉय ग्रूप मधील फुड सांगितलं जातं. यामध्ये पॉमिरियन, पग हे श्वान येतात. मॅक्सी ग्रूप मधील श्वानाचं वजन हे 30 ते 35 किलो पर्यंत असतं. यामध्ये लॅब्रॉडर, गोल्डन रेटरीवर यांचा समावेश होतो. तर जायंट जातींच्या श्वानांचं वजन हे 50 ते 60 किलोच्याही पुढे असते. त्यामुळे या बाबींचा विचार करून श्वानाला आहार द्यावा लागतो, असे देसले सांगतात.
advertisement
श्वानचं दोन पद्धतीनुसार वर्गीकरण
श्वानांचं दोन पद्धतीनुसार वर्गीकरण केलं जातं. एक वजनानुसार व दुसरं स्वभावानुसार असतं. यामध्ये स्मॉल ग्रुप वजन 1 ते 10 किलो पर्यंत असून तीन महिन्यापर्यंत स्टार्टर फुड दिलं जातं. दोन महिन्यापासून पपी फूड देतात. मीडियम ग्रुप मध्ये 11 ते 25 पर्यंत येतो. 3 महिन्यापासून 12 महिन्यापर्यंत पपी फूडच दिलं जातं. त्यानंतर अडल्ट फुड देऊ शकतो. यांनतर 25 ते 40 किलोमध्ये मॅक्सि ग्रुप येतो. म्हणजे 35 दिवसापासून दोन महिने स्टार्टर फूड आणि यापुढे 18 महिन्यांपर्यंत पपी फूड दिलं जातं. 40 ते 90 किलो वजन असणारे श्वान हे जायंट ग्रुप मध्ये येतात. त्यांना दोन महिन्यांपर्यंत स्टार्टर फूड दिलं जातं. यानंतर 22 महिने पपी फूड आणि त्यापुढे अडल्ट फूड देण्यात येतं. सुरुवातीला सर्वच श्वानांना दोन महिन्यांपर्यंत स्टार्टर फूड दिलं जातं, असं देसले सांगतात.
advertisement
गहू आणि गव्हाचे पदार्थ टाळाच
श्वानांसाठी घरगुती पद्धतीचं फूड पाहिलं तर ज्वारी, बाजरीची भाकरी दिली जाते. यामध्ये मटण किंवा चिकन ही देऊ शकतो. पण ते शिजून द्यावं. दही, ताक, सलाड, बीट, दही भातही देऊ शकतो. पण गहू व त्यापासून बनवलेल पदार्थ देणं टाळावं. तसंच तिखट मसालेदार, तेलकट पदार्थ देणंही टाळावं. कारण गव्हामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात. 10 पैकी 8 श्वानांना याचा त्रास होऊ शकतो, अशी माहिती देसले यांनी दिली.
advertisement
कोणते श्वान पाळावे?
स्पॉटिंग ग्रुपचे कुत्रे हे फॅमिलीअर असतात. त्यामुळे ते आपण पाळू शकतो. अमेरिकन वॉटर स्प्रिंनल, इंग्लिश सेटर, लॅब रॉडर रिटरिव्हर, इरीश शेटर, गोल्डन रेट रिव्हर हे आपण सहज पाळू शकतो. तसंच वर्किंग कुत्रे हे संरक्षणासाठी पाळू शकतो. यामध्ये बुल मस्टफ, बॉक्सर, अकिता, बरणेस माउंटन, रोटव्हीलर, इंग्लिश मस्टिफ डॉग हे पाळू शकतो, अशी माहिती डॉग फूड विक्रेते सागर देसले यांनी दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
April 14, 2024 5:18 PM IST