एका प्रश्नानं संसार रक्ताळला! 'सकाळीच दारू कशाला?' पत्नीनं विचारलं अन् पतीनं थेट चाकूच उपसला; पुण्यात खळबळजनक घटना
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
मद्यपानाचं व्यसन घरं उद्ध्वस्त करतं, याचाच प्रत्यय देणारी एक संतापजनक घटना पिंपरी-चिंचवडमधील जाधववाडी परिसरात समोर आली आहे.
पिंपरी-चिंचवड : मद्यपानाचं व्यसन घरं उद्ध्वस्त करतं, याचाच प्रत्यय देणारी एक संतापजनक घटना पिंपरी-चिंचवडमधील जाधववाडी परिसरात समोर आली आहे. सकाळीच मद्यप्राशन केल्याचा जाब विचारणाऱ्या पत्नीवर पतीने घरातच चाकूने सपासप वार करून तिला गंभीर जखमी केलं. या प्रकरणी चिखली पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना जाधववाडीतील पंतनगर येथे घडली. आरोपी दीपक लक्ष्मण भोगल (मूळ रा. बीड) हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मद्यप्राशन करत होता. घटनेच्या दिवशी त्याने सकाळीच मद्यप्राशन केलं होतं. आपल्या संसाराची होणारी ओढाताण पाहून पत्नीने त्याला सकाळीच दारू का पिता? असा प्रश्न विचारून जाब विचारला. ही साधी विचारणा आरोपीला इतकी झोंबली की त्याने घरात राडा घालण्यास सुरुवात केली.
advertisement
पत्नीवर प्राणघातक हल्ला
मद्याच्या नशेत असलेल्या दीपकने पत्नीला अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, रागाच्या भरात त्याने घरातील चाकू उचलला आणि पत्नीवर सपासप वार केले. या हल्ल्यात पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली.
advertisement
जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडित महिलेच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी दीपक भोगल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संसारातील क्षुल्लक कारणावरून थेट जिवावर उठण्याच्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 7:34 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
एका प्रश्नानं संसार रक्ताळला! 'सकाळीच दारू कशाला?' पत्नीनं विचारलं अन् पतीनं थेट चाकूच उपसला; पुण्यात खळबळजनक घटना






