Plastic: प्लास्टिकपासून उपयुक्त वस्तूंची निर्मिती, पुण्यातील संस्था करतेय काम, काय आहे उपक्रम?

Last Updated:

ई-कचऱ्याचे पुनर्वापर करून रोजगार निर्मितीचा अनोखा उपक्रम राबवला आहे. पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेने ई-कचऱ्यातून नवे रोजगार उपलब्ध करून अनेकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे.

+
पूर्णम

पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनचे पर्यावरणपूरक उपक्रम

पुणे: पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन ही संस्था गेल्या दहा वर्षांपासून कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास या क्षेत्रात कार्यरत आहे. या कालावधीत संस्थेने अनेक पर्यावरणपूरक उपक्रम राबवले आहेत. जुन्या कपड्यांपासून नवीन कपडे तयार करणे, प्लास्टिकपासून उपयुक्त वस्तू निर्मिती, ई-कचरा आणि प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन आणि पुनर्नवीनीकरण हे त्यापैकी काही महत्त्वाचे उपक्रम आहेत. या संस्थेच्या उपक्रमाविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश मणेरीकर यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
ई-यंत्रणा प्रकल्प
या प्रकल्पांतर्गत सोसायटी, शाळा, महाविद्यालये आणि कंपन्यांमध्ये कचरा आणि प्लास्टिक संकलन मोहिमा राबविल्या जातात. पुणे, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथे महाअभियाने आयोजित केली जातात. साप्ताहिक संकलन केंद्रांमधून गोळा झालेल्या ई-कचऱ्याचे वर्गीकरण करून वापरण्यायोग्य लॅपटॉप आणि संगणक गरजू शाळा, संस्था आणि विद्यार्थ्यांना दिले जातात. उर्वरित ई-कचरा आणि प्लॅस्टिक कचरा अधिकृत रीसायकलिंग केंद्राकडे पाठवून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. तसेच, ई-कचऱ्यापासून उपयुक्त वस्तू बनवण्याच्या आंतरशालेय स्पर्धाही घेतल्या जातात.
advertisement
परिपूर्ण प्रकल्पाअंतर्गत महिलांच्या हाताला रोजगार
या उपक्रमांतर्गत जुन्या कपड्यांचे संकलन करून वापरण्यायोग्य नवीन कपडे तयार केले जातात आणि ते गरजूंपर्यंत पोहोचवले जातात. उर्वरित कपड्यांपासून विविध वस्तू तयार करून महिलांना रोजगार दिला जातो. कोंढवा, हडपसर, गोखलेनगर आणि वडगाव बुद्रुक येथे प्रशिक्षण केंद्रे कार्यरत आहेत.
advertisement
ग्रीन कन्सल्टन्सी
या प्रकल्पांतर्गत सोसायटी आणि व्यावसायिक स्तरावर कॉम्पोस्ट खत, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि बायोगॅस प्रकल्पांची उभारणी केली जाते. प्रकल्पानंतर आवश्यक मार्गदर्शन दिले जाते. घरगुती वापरासाठी उपयुक्त कॉम्पोस्ट कीट संस्थेद्वारे तयार करण्यात आले असून, घरच्या घरी खत तयार करण्याचे प्रशिक्षण विविध स्तरांवर दिले जाते. पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनच्या या उपक्रमाअंतर्गत मोठ्या प्रमाणात पर्यावरण संवर्धनासाठी मदत होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Plastic: प्लास्टिकपासून उपयुक्त वस्तूंची निर्मिती, पुण्यातील संस्था करतेय काम, काय आहे उपक्रम?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement