Success Story: शिक्षण नववी, बँक बॅलन्स मात्र लाखांत! कामगाराने शोधला सक्सेस मंत्रा
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Success Story: दारफळ (बीबी) या गावात राहणारे समाधान साठे हे शेतात राबणारे सामान्य कामगार होते. त्यांचं शालेय शिक्षण फक्त नववीपर्यंत झालेलं आहे.
सोलापूर: भारत हा कृषी प्रधान देश आहे. आजही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राचं सर्वात जास्त योगदान आहे. असं असूनही शेती क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या स्थिर समजलं जात नाही. त्यामुळे अनेक शेतकरी आता आधुनिकतेची कास धरताना दिसत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी शेतीला पूरक असणारे व्यवसाय सुरू केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील दारफळ (बीबी) या गावातील समाधान साठे यांचा देखील अशाच लोकांमध्ये समावेश होतो. साठे यांनी शिक्षण कमी असूनही फक्त अनुभवाच्या जोरावर नर्सरी उभारली आहे. या नर्सरीतून ते वर्षाला लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवत आहेत.
दारफळ (बीबी) या गावात राहणारे समाधान साठे हे शेतात राबणारे सामान्य कामगार होते. त्यांचं शालेय शिक्षण फक्त नववीपर्यंत झालेलं आहे. स्वत:चा नर्सरी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ते दुसरीकडे कामगार म्हणून कामाला होते. कामाचा अनुभव असल्याने समाधान साठे यांनी नर्सरी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 2007 मध्ये एक गुंठा जागेत नर्सरी व्यवसाय सुरू केला.
advertisement
सुरुवातीला त्यांनी बाहेरून कलिंगडाची तयार रोपं आणून विकली. शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी स्वत: रोपांची निर्मिती सुरू केली. सुरुवातीला फक्त एक गुंठा जागेत असलेली नर्सरी आता दहा गुंठे क्षेत्रावर पसरली आहे. सर्व खर्च वजा करून साठे वर्षाला सात ते आठ लाख रुपयांचं उत्पन्न घेत आहेत.
advertisement
साठे यांच्या नर्सरीमध्ये टोमॅटो, झेंडू, ढोबळी मिरची, तसेच सर्व प्रकारच्या भाजीपाल्याची रोपं मिळतात. त्यांच्या नर्सरीतील रोपं नेण्यासाठी तुळजापूर, धाराशिव, लातूर, अक्कलकोट, कर्नाटक, सांगोला या ठिकाणचे शेतकरी येतात. अंगी जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असेल कमी शिक्षणातही यश मिळवता येते, हे समाधान साठे यांनी दाखवून दिलं आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
August 11, 2025 1:03 PM IST
मराठी बातम्या/Success Story/
Success Story: शिक्षण नववी, बँक बॅलन्स मात्र लाखांत! कामगाराने शोधला सक्सेस मंत्रा

