Pune News: नवले पुलावरील अपघातानंतर प्रशासनाला जाग, दुर्घटना टाळण्यासाठी प्लॅन ठरला
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Navle Bridge Accident: पुण्यातील नवले पुलावरील दूर्घनटेनंतर प्रशासनाला जाग आली असून असे अपघात टाळण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
पुणे: पुण्यातील नवले पुलावर 13 नोव्हेंबरला ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे भीषण अपघात झाला, ज्यात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. नवले ब्रिज खरंच मृत्यूचा सापळा बनत चालला आहे का? हा प्रश्न नागरिकांच्या समोर उभा आहे. मागील 8 वर्षांत या ठिकाणी तब्बल 210 अपघात नोंदले गेले आहेत. यावर उपाय म्हणून, कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलादरम्यान वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी महापालिकेने रम्बल स्ट्रिप बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या रस्त्यावर दर 500 मीटर अंतरावर चांगल्या दर्जाच्या रम्बल स्ट्रिप बसविण्यात येणार आहेत.
या अपघातानंतर प्रशासनाला जाग आली आहे. महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांची शुक्रवारी महापालिकेत बैठक घेण्यात आली. नवले पुलाजवळील तीव्र उतारामुळे या ठिकाणी अपघात होत असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले. यावर उपाय म्हणून, दर 500 मीटर अंतरावर वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी रम्बल स्ट्रिप बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
advertisement
अपघात टाळण्यासाठी महापालिकेचे निर्णय
या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेने तीन टप्प्यांमध्ये उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एलईडी फलक बसविणे, वेगाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करणे, तसेच वाहनांचा वेग सध्या 60 किलोमीटर प्रति तासवरून 40 किलोमीटर प्रति तासपर्यंत आणणे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर, या रस्त्यावर वेग मोजण्यासाठी यंत्रणा आणि कॅमेरे बसविण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. तसेच, बेकायदा पद्धतीने वाहने रस्त्यावर उभी करणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
advertisement
चार सेवा रस्त्यांची कामे सहा महिन्यांत
view commentsकात्रजचा बोगदा ते हिंजवडीदरम्यानच्या पुणे–बेंगळुरू रस्त्यावर वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी चार सेवा रस्त्यांची कामे सुरू आहेत. बालेवाडी ते कात्रजदरम्यानही सेवा रस्ते तयार करणे गरजेचे आहे. काही जागा ताब्यात घ्याव्या लागणार आहेत, त्यासाठी मालकांना टीडीआर, एफएसआय आणि मोबदला दिला जाणार आहे. चार सेवा रस्त्यांची कामे सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 15, 2025 9:49 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: नवले पुलावरील अपघातानंतर प्रशासनाला जाग, दुर्घटना टाळण्यासाठी प्लॅन ठरला


