advertisement

Pune News: नवले पूल की मृत्यूचा सापळा, अपघातांची धक्कादायक आकडेवारी, कारणं काय? Video

Last Updated:

Pune Navle Bridge Accident: पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. नवले पूल परिसरातील 4 किलोमीटरचा महामार्ग हा धोकादायक बनला आहे.

+
Pune

Pune News: नवले पूल की मृत्यूचा सापळा, अपघातांची धक्कादायक आकडेवारी, कारणं काय?

पुणे: पुण्यातील नवले पूल हा अपघात प्रवरण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षात या ठिकाणी अनेक गंभीर अपघात झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात देखील 7 जणांना आपला जीव गमवावा लागला. मात्र नवले पुलावर अपघात का होतात? त्याची नेमकी काय कारणे आहेत? याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत जवळपास 7 ते 8 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. 2014 ते 2022 या काळात कात्रज नवीन बोगदा ते वडगाव पूल 4 किलोमीटरच्या अंतरात 185 अपघात झाले आहेत, ज्यात 65 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
advertisement
अपघाताची कारणे काय? 
तीव्र उतार: कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलापर्यंत खूप तीव्र उतार आहे. त्यामुळे अवजड वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढतो आणि चालकांचे वाहनावरचे नियंत्रण पूर्णपणे सुटते. त्यामुळे वेगावरचे नियंत्रण सुटणे आणि ब्रेक फेल होणे अशा घटना घडतात.
पुलाची चुकीची रचना: वारंवार अपघात घडत असलेल्या नवले पुलाची रचना अपघातास कारणीभूत असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येते.
advertisement
दरम्यान, 20 नोव्हेंबर 2022 रोजी एका भरधाव ट्रकने सुमारे 30 हून अधिक गाड्यांना धडक दिली होती. तर आता पुन्हा एकदा एका कंटेनरने ट्रक आणि काही कारना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. नवले पुलावरील अपघातांची ही मालिका गंभीर मुद्दा बनवला असून यावर तोडगा काढण्याची मागणी आता प्रवासी आणि पुणेकरांकडून होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: नवले पूल की मृत्यूचा सापळा, अपघातांची धक्कादायक आकडेवारी, कारणं काय? Video
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement