शेतकऱ्यांची लेकरंही घडाघडा बोलतात स्पॅनिश; पुण्याच्या ZP शाळेतील अनोखा प्रयोग

Last Updated:

जिल्हा परिषदेच्या शाळा तेथील खराब परिस्थितीमुळे अनेकदा चर्चेत असतात. पण, काही शाळा त्याला खणखणीत अपवाद आहेत

+
News18

News18

पुणे, 7 सप्टेंबर :  जगातल्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे त्याच्या शिक्षकानं घेतलेली मेहनत असते. यशस्वी आयुष्याचा पाया रचण्याचं काम शाळेत होते. जिल्हा परिषदेच्या शाळा म्हंटलं की त्या अनेकदा तेथील खराब परिस्थितीमुळेच चर्चेत असतात. पण, काही झेडपी शाळा त्याला खणखणीत अपवाद आहेत. या शाळेत मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जातंय. पुणे जिल्ह्यातल्या एका झेपी शाळेत तर विद्यार्थ्यांना स्पॉनिश भाषेचं शिक्षण दिलं जातंय.
भोर तालुक्यातील सारोळे गावांमध्ये पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना स्पॉनिशचे धडे दिले जातायत. जगभरात 20 पेक्षा जास्त देशांची स्पॉनिश ही अधिकृत भाषा आहे. परदेशी भाषा शिकल्यामुळे आपण त्या देशात स्थलांतर करून तेथील संगीत संस्कृती, साहित्य यांचा सखोल अभ्यास करून स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी ही याचा उपयोग करून घेऊ शकतो. जगभरात आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे परकीय भाषा शिकणे आवश्यक झालंय.
advertisement
या शाळेतल्या शिक्षिका वंदना कोरडे या स्वत: शिकून स्पॉनिश भाषेचे वर्ग चालवतात. 'साधारण एक वर्षभरापूर्वी मी स्पॅनिश भाषा मुलांना शिकवायला आणि स्वतही शिकायला सुरुवात केली. त्यावेळी अनेकांनी याबद्दल प्रश्न विचारले. शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामं असताना तू आणखी काम का वाढवत आहेस? असंही विचारण्यात आलं. मी सर्व नकारात्मकता बाजूला सारुन माझे काम सुरू केले,' असं वंदना यांनी सांगितलं.
advertisement
'हा प्रोजेक्ट राबवताना येणाऱ्या अडचणींना मलाच तोंड द्यावे लागणार होते.  'स्पॉनिश टू मराठी' नोट्स कुठेही उपलब्ध नाहीत. त्या नोट्स मलाच तयार कराव्या लागल्या. या शाळेत एमआयडीसीमधील कामगार, मजूर, शेतकऱ्यांची मुलं शिकतात. ही मुलं स्पॉनिश बोलतात त्यावेळी त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर खूप अभिमानाचे भाव असतात, असंही त्यांनी सांगितलं.
advertisement
मराठी बातम्या/पुणे/
शेतकऱ्यांची लेकरंही घडाघडा बोलतात स्पॅनिश; पुण्याच्या ZP शाळेतील अनोखा प्रयोग
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement