धक्कादायक घटनांनंतर पुण्यातून सुखावणारी बातमी; 4 वर्षांपासूनचा 'तो' भीतीदायक आलेख अखेर खाली घसरला!
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
Crimes against women: पुणे शहरातून एक महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी समोर येत आहे.
पुणे : पुणे शहरातून एक महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी समोर येत आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना २०२५ मध्ये प्रथमच काहीसा ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. पुणे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांच्या नोंदीमध्ये घट झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या सुरक्षेबाबत पुण्यात चिंतेचे वातावरण होते, मात्र २०२५ सालच्या आकडेवारीने पुणेकरांना काहीसा दिलासा दिला आहे. गेल्या चार वर्षांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा आलेख सातत्याने चढता होता, जो यंदा प्रथमच खाली घसरला आहे. पोलिसांची वाढलेली गस्त, महिला सुरक्षा कक्ष आणि 'दामिनी पथका'चा प्रभावी वावर यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
advertisement
बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांत घट: पोलिसांच्या अधिकृत नोंदीनुसार, २०२४ मध्ये शहरात बलात्काराच्या ४९९ घटनांची नोंद झाली होती, ती २०२५ मध्ये कमी होऊन ४७३ वर आली आहे. त्याचप्रमाणे विनयभंगाच्या घटनांमध्येही घट झाली असून, २०२४ मधील ८४४ प्रकरणांच्या तुलनेत २०२५ मध्ये ८३६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. जरी ही घट किंचित असली, तरी वाढता आलेख रोखण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे, ही एक जमेची बाजू मानली जात आहे.
advertisement
आकडेवारीचा कल आणि चिंता: २०२१ पासूनचा विचार केला असता, पुण्यात बलात्काराच्या २८३ आणि विनयभंगाच्या ३८२ घटना घडल्या होत्या. त्यानंतर हा आकडा दरवर्षी वाढत जाऊन २०२४ मध्ये त्याने उच्चांक गाठला होता. २०२५ मधील घसरण सकारात्मक असली तरी एकूण आकडेवारी अजूनही चिंताजनक आहे. विशेषतः २०२५ मध्ये समोर आलेल्या बलात्काराच्या प्रकरणांमध्ये एक धक्कादायक बाब म्हणजे, जवळपास सर्वच प्रकरणांमधील आरोपी हे पीडित महिलेच्या परिचयाचे किंवा ओळखीचे होते.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 10:47 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
धक्कादायक घटनांनंतर पुण्यातून सुखावणारी बातमी; 4 वर्षांपासूनचा 'तो' भीतीदायक आलेख अखेर खाली घसरला!









