advertisement

SBI चा अधिकारीच निघाला चोर! आलिशान गाड्या खरेदीसाठी बँकेत मोठा घोटाळा, EDचे पुण्यात 12 ठिकाणी छापे

Last Updated:

कुलकर्णी हा 2017 ते 2019 या दोन वर्षांमध्ये स्टेट बँकेच्या विद्यापीठ रोड शाखेचा मुख्य व्यवस्थापक असताना त्याने हा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

गाड्या खरेदीसाठी बँकेत मोठा घोटाळा
गाड्या खरेदीसाठी बँकेत मोठा घोटाळा
पुणे : पुण्यातून मोठा आर्थिक घोटाळा समोर आला आहे. यात आर्थिक पात्रता नसलेल्या ग्राहकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे आलिशान गाड्यांच्या खरेदीसाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुण्यात 12 ठिकाणी मोठी छापेमारी केली. या घोटाळ्यात मनी लाँड्रिंग झाल्याचं उघडकीस आल्यानं ईडीने तपास सुरू केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार स्टेट बँकेचा तत्कालीन मुख्य व्यवस्थापक अमर कुलकर्णी हा आहे. त्याच्यासोबत कर्ज मंजुरीसाठी मदत करणारा आदित्य सेठिया आणि काही कर्ज घेणारे ग्राहक यांनी संगनमत करून स्टेट बँकेचे मोठे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. कुलकर्णी हा 2017 ते 2019 या दोन वर्षांमध्ये स्टेट बँकेच्या विद्यापीठ रोड शाखेचा मुख्य व्यवस्थापक असताना त्याने हा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
advertisement
अमर कुलकर्णी याने आदित्य सेठियाच्या माध्यमातून अनेक ग्राहकांना महागड्या गाड्यांसाठी कर्ज वितरित केले. कर्जासाठी ग्राहकांची आर्थिक क्षमता तपासणे आवश्यक असतं. मात्र, कुलकर्णीने केवळ त्याकडे दुर्लक्षच केलं नाही, तर कर्ज मंजूर करण्यासाठी बनावट कागदपत्रंही स्वीकारली. एवढंच नव्हे तर, काही प्रकरणांमध्ये त्याने गाड्यांची किंमत वाढवून दाखवून कर्जाची अधिक रक्कमदेखील मंजूर केल्याचं तपास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं आहे.
advertisement
ईडीच्या अधिकाऱ्यांनी या छाप्यांदरम्यान या संशयास्पद व्यवहारांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणी सर्वप्रथम केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर आता ईडीने मनी लाँड्रिंगच्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
SBI चा अधिकारीच निघाला चोर! आलिशान गाड्या खरेदीसाठी बँकेत मोठा घोटाळा, EDचे पुण्यात 12 ठिकाणी छापे
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement