advertisement

112 कोटींच्या सरकारी निधीवर डल्ला मारण्याचा डाव कसा उधळला? नगराध्यक्षाला अटक

Last Updated:

जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्यातून बनावट सह्या आणि खोट्या धनादेशांच्या मदतीने तब्बल १११ कोटी ६३ लाख रुपयांचा मोठा सरकारी निधी हडपण्याचा अत्यंत गंभीर कट उघडकीस आला आहे

घोटाळ्याचा पर्दाफाश
घोटाळ्याचा पर्दाफाश
पालघर : जव्हारमधून एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्यातून बनावट सह्या आणि खोट्या धनादेशांच्या मदतीने तब्बल १११ कोटी ६३ लाख रुपयांचा मोठा सरकारी निधी हडपण्याचा अत्यंत गंभीर कट उघडकीस आला आहे. एसबीआय (SBI) शाखा, जव्हार येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा कट वेळीच उधळला गेला आणि शासनाचे शेकडो कोटींचे नुकसान टळले.
याप्रकरणी जव्हार पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी, ओवी कन्स्ट्रक्शनचे मालक आणि विक्रमगडचे विद्यमान नगराध्यक्ष नीलेश ऊर्फ पिंका पडवळे यांना अटक केली आहे. पडवळे यांच्यासोबतच यज्ञेश अंभिरे यालाही अटक करण्यात आली आहे. अंभिरे हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा (PWD) अधिकृत कर्मचारी नसून, त्याला पडवळे यांनीच कार्यालयात तात्पुरत्या कामासाठी ठेवले होते आणि त्याचा पगारही पडवळेच देत होते.
advertisement
बँक कर्मचाऱ्यांमुळे प्रकरण उघड
सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हारचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांनी शुक्रवारी रात्री जव्हार पोलिसांत अधिकृत तक्रार दिली. बँक व्यवस्थापक संजय आणि कर्मचारी राहुल सोनवणे यांनी धनादेशावरील शिक्के, तारीख आणि सह्या संशयास्पद असल्याचे ओळखले आणि तातडीने हा व्यवहार थांबवला. अंभिरे हा खोटा धनादेश डिमांड ड्राफ्टसाठी बँकेत घेऊन गेला होता. मात्र, तो वठला नाही, म्हणून चौकशीसाठी ओवी कन्स्ट्रक्शनचे मालक नीलेश पडवळे व इतर दोघे बँकेत आल्यानंतर बँक अधिकाऱ्यांचा संशय अधिक बळावला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
advertisement
या बँक धनादेश प्रकरणामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. न्यायालयाने दोन्ही संशयित आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या कोट्यवधींच्या फसवणुकीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
112 कोटींच्या सरकारी निधीवर डल्ला मारण्याचा डाव कसा उधळला? नगराध्यक्षाला अटक
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement