आता तुम्ही घरीच थांबा! पुण्यातील लहानग्यांना अंगणवाडीत कोंडणाऱ्या दोघींवर कारवाई

Last Updated:

सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांच्यावर प्राथमिक कारवाई करण्यात आली आहे. मुळशीच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना अधिकाऱ्यांनी या दोघींना कामावर येण्यास प्रतिबंध केल्याचं समोर आलं आहे.

लहानग्यांना अंगणवाडीत कोंडलं
लहानग्यांना अंगणवाडीत कोंडलं
पुणे : अंगणवाडीतील लहान मुलांना आत कोंडून ग्रामपंचायत कार्यालयातील बैठकीला गेल्याप्रकरणी हिंजवडीतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसावर कारवाई करण्यात आली आहे.
अंगणवाडी क्रमांक तीनच्या सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांच्यावर प्राथमिक कारवाई करण्यात आली आहे. मुळशीच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना अधिकाऱ्यांनी या दोघींना कामावर येण्यास प्रतिबंध केल्याचं समोर आलं आहे.
बुधवारी (२६ नोव्हेंबर) हिंजवडीमध्ये हा गंभीर प्रकार घडला होता. अंगणवाडीत चिमुकली मुलं असताना सेविका आणि मदतनीस दरवाजाला कुलूप लावून बैठकीसाठी निघून गेल्याचं काही जागरूक नागिरकांच्या लक्षात आलं. नागरिकांनी तत्काळ सेविकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार नोंदवली. मुलांच्या सुरक्षेशी संबंधित हा गंभीर प्रकार असल्याने पालकांनी त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
advertisement
मुळशीचे एकात्मिक बालविकास सेवायोजना अधिकारी धनराज गिराम यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून अहवाल मागवला असून, त्यानंतर नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, अंगणवाडी क्रमांक तीनमधील काम थांबणार नाही, यासाठी दुसऱ्या अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीसांना तात्पुरत्या स्वरूपात या कामाची अतिरिक्त जबाबदारी पाहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
advertisement
काय होती घटना -
आयटीनगरी हिंजवडी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला होता. यात 20 लहानग्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवल्याचा प्रताप समोर आला. हिंजवडीत वीस लहानग्यांना अंगवाडीत कोंडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बैठकीला गेल्याची संतापजनक घटना समोर आली होती. या घटनेचा व्हिडीओही समोर आला. हे पाहून पालकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. हिंजवडीतील अंगणवाडी क्रमांक 3 मधील सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी हा प्रताप केला. ग्रामपंचायतीत एका माजी सरपंचाने बैठकीला बोलावलं म्हणून आम्ही मुलांना आत ठेवून अंगवाडीला कुलूप लावलं, असा खुलासा या दोघींनी केला. यादरम्यान बराच वेळ आत कोंडलेली लहान मुलं मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडत होती. बुधवारी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
आता तुम्ही घरीच थांबा! पुण्यातील लहानग्यांना अंगणवाडीत कोंडणाऱ्या दोघींवर कारवाई
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement