advertisement

रिक्षात विसरली दागिन्यांची बॅग; महिला ढसाढसा रडायला लागली, शेवटी पोलिसांनी शोधलीच, पण कशी?

Last Updated:

एक महिला लाखो रुपये किमतीचे दागिने आणि महत्त्वाचे कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात विसरली. उतरल्यावर ही बाब लक्षात येताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली

रिक्षात विसरली दागिन्यांची बॅग (AI image)
रिक्षात विसरली दागिन्यांची बॅग (AI image)
पुणे : एक महिला लाखो रुपये किमतीचे दागिने आणि महत्त्वाचे कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात विसरली. उतरल्यावर ही बाब लक्षात येताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. अखेर वारजे माळवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत ही बॅग शोधून परत केली आहे. या महिलेच्या बॅगेत असलेले दागिने तिच्या बहिणीचे होते. त्यामुळे, बहिणीचे दागिने हरवल्यामुळे मोठे संकट कोसळेल या भीतीने रडत असलेल्या महिलेला पोलिसांनी तातडीने मदत करत मोठा दिलासा दिला आहे.
झालं असं की, हर्षा गिरासे नामक महिला शनिवारी सकाळी आपल्या बहिणीच्या घरून (सुरत) खासगी ट्रॅव्हल्सने नांदेड सिटी येथील घरी परतत होत्या. देहूरोड बायपास मार्गे वारजे येथे उतरण्याऐवजी त्या चुकून नवले ब्रिज येथे उतरल्या. लहान मूल सोबत असल्याने घाईगडबडीत नवले ब्रिजवरून वारजे येथे येण्यासाठी त्यांनी रिक्षा पकडली. मात्र, घरी पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, सोन्याचे दागिने आणि दस्तऐवज असलेली त्यांची महत्त्वाची बॅग रिक्षातच विसरली आहे. रिक्षाचा नंबर माहीत नसल्याने आणि बहिणीने विश्वासाने दिलेले दागिने गमावल्यामुळे होणाऱ्या परिणामाच्या भीतीने हर्षा गिरासे यांनी वारजे पोलीस ठाण्यात धाव घेत आर्त विनवणी केली.
advertisement
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईगंडे आणि गुन्हे निरीक्षक प्रकाश धेंडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले. त्यांनी पोलीस बिट मार्शल शिवाजी भोसले आणि माधव औताडे यांना तातडीने वारजे सर्विस रोड ते नवले ब्रिज परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले. पोलीस अंमलदार नंदकुमार चव्हाण, शिवाजी भोसले आणि माधव औताडे यांनी अथक प्रयत्न करून अवघ्या तीन तासांत अनेक फुटेज तपासले. त्यांनी रिक्षाचा नंबर शोधून 'नाकाबंदी' ॲपच्या मदतीने रिक्षाचालकाचा पत्ता आणि मोबाईल नंबर शोधून काढला. रिक्षाचालकाशी संपर्क साधून त्याला नवले ब्रिजखाली बोलावण्यात आले आणि रिक्षाच्या मागील सीटवर असलेली ती बॅग हर्षा गिरासे यांना सुपूर्द करण्यात आली. बहिणीने विश्वासाने दिलेले दागिने सुखरूप पाहिल्यानंतर हर्षा गिरासे यांनी पोलिसांचे आभार मानले.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
रिक्षात विसरली दागिन्यांची बॅग; महिला ढसाढसा रडायला लागली, शेवटी पोलिसांनी शोधलीच, पण कशी?
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement