पुण्यात छतावर पाण्याची टाकी बसवायला चढलेला तरुण परतलाच नाही, आईला मोठा धक्का, पोलिसात धाव, काय घडलं?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
इमारतीच्या छतावर पाण्याची प्लॅस्टिक टाकी बसवत असताना भयंकर घडलं. आधार दिलेला गज अचानक तुटल्याने टाकी अंगावर कोसळून एका २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला
पुणे : पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एरंडवणे परिसरात एक भीषण दुर्घटना घडली आहे. इमारतीच्या छतावर पाण्याची प्लॅस्टिक टाकी बसवत असताना भयंकर घडलं. आधार दिलेला गज अचानक तुटल्याने टाकी अंगावर कोसळून एका २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत डेक्कन पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडवणे परिसरातील गुलमोहर अपार्टमेंटच्या आवारात एक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी आहे. या लॅबोरेटरीला पाणीपुरवठा करण्यासाठी छतावर नवीन प्लॅस्टिक टाकी बसवण्याचे काम शुक्रवारी (दि. २० मार्च) दुपारी सुरू होते. राहुल श्रीकांत सतनामी (वय २१, रा. धायरी, सिंहगड रस्ता) हा तरुण हे काम करत होता. टाकीला आधार देण्यासाठी लोखंडी गजाचा वापर करण्यात आला होता. मात्र, काम सुरू असताना अचानक हा गज तुटला आणि अवजड टाकी थेट राहुलच्या अंगावर कोसळली.
advertisement
टाकी कोसळल्याने राहुलला गंभीर अंतर्गत दुखापत झाली. त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राहुल अवघ्या २१ वर्षांचा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत राहुलची आई सीमा सतनामी (४४) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची काळजी न घेतल्याने हा अपघात झाल्याचा आरोप केला आहे.
advertisement
डेक्कन पोलिसांनी याप्रकरणी दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा नोंदवला आहे. या कामात सुरक्षिततेचे नियम पाळले होते का? आणि वापरलेला लोखंडी गज निकृष्ट दर्जाचा होता का? याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 12:15 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात छतावर पाण्याची टाकी बसवायला चढलेला तरुण परतलाच नाही, आईला मोठा धक्का, पोलिसात धाव, काय घडलं?







