advertisement

Massajog Sarpanch: मस्साजोगचा नवा कारभारी कोण? संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोटनिवडणूक जाहीर

Last Updated:

Massajog Sarpanch: संतोष देशमुख यांच्या मस्साजोग येथील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Massajog: मस्साजोगचा नवा कारभारी कोण? संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोटनिवडणूक जाहीर
Massajog: मस्साजोगचा नवा कारभारी कोण? संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोटनिवडणूक जाहीर
बीड: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर 2024 मध्ये निर्घृण हत्या झाली होती. या घटनेनं महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं होतं. आता रिक्त झालेल्या सरपंच पदाची पोटनिवडणूक लवकरच होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 28 एप्रिल रोजी मतदान तर 29 एप्रिलला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे मस्साजोगचा नवा कारभारी कोण? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर 2024 मध्ये वाल्मीक कराड आणि त्याच्या टोळीने हत्या केली होती. तेव्हापासून मस्साजोगचं सरपंचपद रिक्त आहे. आता बीड जिल्ह्यातील 88 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये 16 थेट सरपंच आणि 72 सदस्य पदांच्या निवडी होणार आहेत. विशेष म्हणजे यातील 45 जागा लोकप्रतिनिधींचं निधन झाल्याने रिक्त आहेत. तर 20 जागा अपात्रतेमुळे रिक्त झालेल्या आहेत.
advertisement
निवडणूक बिनविरोध होणार का?
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोग महाराष्ट्रात चर्चेत आलं होतं. त्यांच्या निधनानंतर त्यांचे भाऊ धनंजय देशमुख सक्रिय आहेत. आता या निवडणुकीत संतोष देशमुख यांचे बंधू किंवा पत्नीला उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ही निवडणूक बिनविरोध होणार की ग्रामपंचायतमध्ये रणसंग्राम होणार? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे गावकरी काय भूमिका घेतात? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
निवडणूक कार्यक्रम कसा?
अर्ज दाखल करणे : 7 ते 13 एप्रिल 2026
छाननी : 15 एप्रिल 2026
अर्ज मागे घेणे : 17 एप्रिल 2026
मतदान : 28 एप्रिल (सकाळी 7.30 ते 5.30)
निकाल : 29 एप्रिल 2026
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Massajog Sarpanch: मस्साजोगचा नवा कारभारी कोण? संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोटनिवडणूक जाहीर
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement