advertisement

दोघंही आयटी इंजिनिअर, पण लग्नानंतर पुण्यातून पोतुर्गालला गेलेला पती परतलाच नाही; 6 वर्ष पाहिली वाट, शेवटी पत्नीनं उचललं हे पाऊल

Last Updated:

हे दोघेही उच्चशिक्षित असून आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. जुलै २०१४ मध्ये त्यांचा विवाह नोंदणी पद्धतीने झाला होता. काही वर्षांनंतर हे जोडपे नोकरीनिमित्त पुण्यात स्थलांतरित झाले

दोघांमध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यावर एकमत (प्रतिकात्मक फोटो)
दोघांमध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यावर एकमत (प्रतिकात्मक फोटो)
पुणे: पती-पत्नीचं नातं हे अतिशय खास आणि अनोखं असतं. एकमेकांची प्रत्येक सुख-दुःखात साथ देत ते आपला संसार पुढे नेतात. मात्र, कधीकधी लग्नानंतरही पती-पत्नीमध्ये ते खास नातं तयारच होतं नाही आणि शेवटी पर्याय उरतो, तो घटस्फोटाचा. असंच एक प्रकरण आता समोर आलं आहे. यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पुणे कौटुंबिक न्यायालयाने एक अनोखा निकाल दिला आहे. युरोपातील पोर्तुगाल देशात नोकरीनिमित्त स्थायिक झालेला पती आणि पुण्यात राहणारी पत्नी यांचा घटस्फोट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) मंजूर करण्यात आला आहे. प्रमुख न्यायाधीश श्याम रुक्मे यांनी हा निकाल दिला . यात ६ महिन्यांचा अनिवार्य 'वेटिंग पिरीयड' देखील शिथिल करण्यात आला आहे.
नेमकी पार्श्वभूमी काय?
मूळचे कोलकता येथील असलेले रमेश आणि निता (नावे बदलली आहेत) हे दोघेही उच्चशिक्षित असून आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. जुलै २०१४ मध्ये त्यांचा विवाह नोंदणी पद्धतीने झाला होता. काही वर्षांनंतर हे जोडपे नोकरीनिमित्त पुण्यात स्थलांतरित झाले. मात्र, पती नोकरीसाठी पोर्तुगालला गेला आणि त्यानंतर तो परतलाच नाही. जानेवारी २०२१ पासून हे दोघेही विभक्त राहत होते.
advertisement
न्यायालयाने का दिली सवलत?
दोघांमध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यावर एकमत झाले होते. मात्र, पतीला पोर्तुगालहून वारंवार भारतात येणे शक्य नव्हते. अॅड. सचिनकुमार गेलडा यांनी पतीची बाजू मांडताना सहा महिन्यांचा 'कुलिंग ऑफ पिरीयड' वगळण्याची विनंती केली. गेल्या पाच वर्षांपासून हे जोडपे वेगळे राहत असल्याने आणि त्यांना अपत्य किंवा मालमत्तेचा कोणताही वाद नसल्याने न्यायालयाने ही विनंती मान्य केली. अवघ्या तीन तारखांमध्ये हा खटला निकाली निघाला.
advertisement
तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर
न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पतीची ओळख पटवून घेतली आणि त्याची संमती नोंदवून घेतली. प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या प्रकरणांमध्ये अशा प्रकारे निकाल दिल्याने वेळेची आणि पैशांची मोठी बचत झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
दोघंही आयटी इंजिनिअर, पण लग्नानंतर पुण्यातून पोतुर्गालला गेलेला पती परतलाच नाही; 6 वर्ष पाहिली वाट, शेवटी पत्नीनं उचललं हे पाऊल
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement