Ayush Komkar Murder Case : पुणे टू परभणी...! 369 किलोमीटर पाठलाग अन् बंडू आंदेकरच्या मुसक्या आवळल्या, समृद्धी महामार्गावर अटकेचा थरार!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Bandu Andekar Arrested in buldhana : पुणे गँगवॉर प्रकरणातील आरोपींना बुलढाणा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. तब्बल सात ते आठ आरोपीना बुलढाणा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Ayush Komkar Murder Case Update : पुण्यातील नाना पेठेत गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला शहरात गॅंगवाराचा जो भडका उडाला होता, त्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला आंदेकर टोळीने आयुष कोमकरचा खून करून घेतला. आंदेकर टोळीने पिस्तुलातून 11 गोळ्या झाडल्या. त्यातील 3 गोळ्या लागून आयुषचा मृत्यू झाला आहे. घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणात 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच परभणीत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या बंडू आंदेकरच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
समृद्धी महामार्गावर अटक
पुणे गँगवॉर प्रकरणातील आरोपींना बुलढाणा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. तब्बल सात ते आठ आरोपीना बुलढाणा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी समृद्धी महामार्गावर सापळा रचून बुलढाणा पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सर्वच आरोपी हे पूना परिसरातील असल्याची माहिती आहे. सर्व आरोपींना पुणे पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे. आरोपी परभणीत पळण्याच्या मार्गावर होते, अशी माहिती मिळाली आहे.
advertisement
बुलढाणा पोलिसांनी मुसक्या आवळल्या
मोस्ट वॉन्डेट आरोपी पळ काढत असल्याची माहिती बुलढाणा पोलिसांना मिळाली. समृद्धी महामार्गावर पोलीस पेट्रोलिंग करत असताना आरोपींना पकडल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर आरोपींची नावं गोपनीय ठेवण्यात आली आहेत. बुलडाण्याला लागून असलेल्या समृद्धी महामार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने आणि स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
6 आरोपींना अटक
दरम्यान, कल्याणी कोमकर यांनी दोन्ही फायरिंग करणाऱ्या आरोपींना ओळखलं असून अमन पठाण आणि यश पाटील अशी दोघांची नावं आहेत. दोन्ही आरोपी आंदेकर टोळीसाठी काम करत असल्याचा आरोप देखील कल्याणी कोमकर यांनी एफआयआरमध्ये केला आहे.
आयुष कोमकर हत्या प्रकरणी कोणावर गुन्हे दाखल?
गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर (वय 60), कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय 41), शिवम उर्फ शुभम सूर्यकांत आंदेकर (वय 31), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय 21), शिवराज उदयकांत आंदेकर (वय 29), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय 60), वृंदावनी निलंजय वाडेकर (वय 40), तुषार निलंजय वाडेकर (वय 26), स्वराज निलंजय वाडेकर (वय 22), अमन युसुफ पठाण उर्फ खान, सुजल राहुल मेरगु (वय 23), यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे (वय 19) अशा 13 जणांचा समावेश आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 09, 2025 10:54 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ayush Komkar Murder Case : पुणे टू परभणी...! 369 किलोमीटर पाठलाग अन् बंडू आंदेकरच्या मुसक्या आवळल्या, समृद्धी महामार्गावर अटकेचा थरार!