Maharashtra Cabinet Meeting Farmers : वीजदर सवलतीपासून ते जलसिंचनापर्यंत! महायुती सरकारचे शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय

Last Updated:

Maharashtra Cabinet Meeting : शेतकऱ्यांसाठी असलेल्या वीज दर सवलतींचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्याशिवाय काही जिल्ह्यातील सिंचनासाठीच्या तरतुदीत वाढ करण्यात आली आहे.

AI Generated Photo
AI Generated Photo
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांसाठी असलेल्या वीज दर सवलतींचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्याशिवाय काही जिल्ह्यातील सिंचनासाठीच्या तरतुदीत वाढ करण्यात आली आहे.
आज झालेल्या राज्याच्या कॅबिनेट बैठकीत मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ११६ कोटी रुपयांची कर्ज उभारणी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे मीरा-भाईंदर शहरवासियांना मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या बैठकीत एकूण 4 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement

शेतकऱ्यांना दिलासा....

ऊर्जा विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. आता, उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन अशा सर्व प्रकारच्या 1 हजार 789 योजनांना वीज दरात सवलतीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील घोंगा आणि कानडी येथील लघु पाटबंधारे प्रकल्प योजनांच्या दुरुस्ती खर्चाची तरतूद करण्यास आजच्या बैठकीत मान्यता दिली आहे. या निर्णयाने मुर्तिजापूर तालुक्यातील सिंचन क्षमतेत वाढ होणार असून शेतीला आणखी पाणी मिळणार आहे.
advertisement

मंत्रिमंडळातील इतर निर्णय...

नगरविकास विभाग- नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यात हुडकोकडून 2000 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मान्यता. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी 822 कोटी रुपये, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चार मलनिस्सारण प्रकल्पासाठी 268 कोटी रुपये, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी 116 कोटी रुपये कर्ज उभारणी करण्यात येणार आहे.
advertisement
महसूल विभाग- रायगड जिल्ह्यातील मौजे आसुडगाव (ता. पनवेल) येथील शासकीय गायरानातील चार हेक्टर जमीन भारत सरकारच्या सब्सिडरी इंटेलिजन्स ब्युरो यांना अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थाने (रहिवास क्वार्टर्स) बांधण्यासाठी देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Cabinet Meeting Farmers : वीजदर सवलतीपासून ते जलसिंचनापर्यंत! महायुती सरकारचे शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement