पुण्याचा गुंड निलेश घायवळ लंडनला पसार, जाता जाता नगर पोलिसांना लावला चुना, नेमका कांड काय केला?

Last Updated:

Nilesh Ghaiwal News: पुण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनला पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.

News18
News18
पुणे: गंभीर गुन्हे दाखल असलेला पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनला पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पुण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असतानाही अहिल्यानगरमधील बनावट पत्ता वापरून त्याने पासपोर्ट मिळवल्याचं उघड झालं आहे. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे दुर्लक्ष करून अहिल्यानगर पोलिसांनी त्याला पासपोर्टसाठी संमती दिलीच कशी, असा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यामुळे नगर पोलीस वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

नगरच्या बनावट पत्त्यावर पासपोर्ट

पुण्यात गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याने पासपोर्ट मिळवण्यात अडचण येईल, हे ओळखून निलेश घायवळने चलाखी केली. त्याने अहिल्यानगर येथील पत्ता वापरला. त्याने कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गौरी घुमटानंदी बाजार, कोतवाली, माळीवाडा रोड असा पत्ता पासपोर्टसाठी दिला होता. या बनावट पत्त्याच्या आधारेच त्याला पासपोर्ट मिळाला.

अहिल्यानगर पोलीस संशयाच्या भोवऱ्यात

advertisement
अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिसांनी निलेश घायवळचा गंभीर गुन्हेगारी इतिहास न तपासता त्याच्या पासपोर्टसाठी संमती दिलीच कशी? हत्या, खंडणी, अपहरण, मारामारी यांसारखे गंभीर गुन्हे घायवळवर पुणे शहरात दाखल आहेत. या प्रकारामुळे आता नगर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घायवळला नगरमधून पासपोर्ट मिळवण्यासाठी नेमका कोणाचा पाठिंबा मिळाला, याची चौकशी होण्याची शक्यता आहे.
advertisement

गोळीबार प्रकरणानंतर मकोका अंतर्गत कारवाई

पुण्यातील कोथरुडमध्ये १७ सप्टेंबर रोजी दोन नागरिकांवर घायवळ टोळीने हल्ला केला होता. यातील एकावर गोळीबार तर दुसऱ्यावर कोयत्याने वार करून जखमी केलं होतं. हा हल्ला निलेश घायवळच्या टोळीने केल्याचे उघड झाले. यानंतर घायवळ आणि त्याच्या इतर सहा साथीदारांवर 'मकोका' (MCOCA) कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात आली. मात्र, याच दरम्यान पोलिसांना चकवा देऊन निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याचे तपासात स्पष्ट झाले. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंडाला सहज पासपोर्ट मिळाल्यामुळे आता पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्याचा गुंड निलेश घायवळ लंडनला पसार, जाता जाता नगर पोलिसांना लावला चुना, नेमका कांड काय केला?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement