Hadapsar Diveghat Road: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; हडपसर-दिवेघाट मार्ग आज या वेळेत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, कारण काय?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. हडपसर ते दिवेघाट दरम्यान आज दोन तास वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे.
पुणे: पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. हडपसर ते दिवेघाट दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी आज, सोमवार (२३ फेब्रुवारी) रोजी दुपारी दोन तास वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे. महामार्गावरील धोकादायक वळणे आणि खडक फोडण्यासाठी केल्या जाणाऱ्या 'ब्लास्टिंग'मुळे (स्फोट) सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाहतूक बंद राहण्याची वेळ
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 1 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णतः बंद असेल. या दोन तासांच्या कालावधीत ब्लास्टिंगचे काम पूर्ण केले जाईल.
advertisement
पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
हडपसर आणि सासवडच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने खालील सूचना केल्या आहेत:
दुपारी १ ते ३ या वेळेत शक्यतो या मार्गावर प्रवास करणे टाळावे.
ज्यांना तातडीचे काम आहे, त्यांनी बोपदेव घाट किंवा फुरसुंगी-लोणी काळभोरमार्गे पर्यायी रस्त्यांचा वापर करावा.
जड वाहनांनी ब्लास्टिंगचे काम पूर्ण होईपर्यंत सुरक्षित ठिकाणी थांबावे.
advertisement
प्रशासनाकडून सहकार्याची विनंती
रस्ता रुंदीकरणामुळे भविष्यात या मार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. मात्र, आजच्या कामामुळे होणारी तात्पुरती गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी आणि वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 6:43 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Hadapsar Diveghat Road: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; हडपसर-दिवेघाट मार्ग आज या वेळेत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, कारण काय?







