Pune Airport Update : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! दुसऱ्या विमानतळाच्या उभारणीसाठी प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Last Updated:

Purandar Airport Update : दुसऱ्या विमानतळाच्या भूसंपादनाबाबत प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात संमती मिळाल्यामुळे प्रकल्पाला गती मिळेल आणि पुणेकरांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे.

News18
News18
पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या कामाला आता अधिक गती मिळत आहे. भूसंपादन प्रक्रियेत जिल्हा प्रशासनाने मोठी प्रगती साधली असून शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अधिकृत माहितीनुसार, आतापर्यंत 62 टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी स्वेच्छेने आपली संमती दर्शवली आहे. गेल्या अवघ्या पंधरवड्यात, या विमानतळामुळे प्रभावित होणाऱ्या सात गावांतील तब्बल 1,600 शेतकऱ्यांनी जवळपास 1,750 एकर जमिनीबाबत संमतीपत्रे प्रशासनाकडे सादर केली आहेत. विशेष म्हणजे, मुंजवडी गावात सुमारे 90 टक्के शेतकऱ्यांनी आपली तयारी दाखवली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
मागील अधिसूचनेनुसार विमानतळ प्रकल्पासाठी एकूण 2,673 हेक्टर जमीन आवश्यक होती. मात्र, शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आणि पुनर्विचार करून आता ते क्षेत्र कमी करण्यात आले आहे. सुधारित योजनेनुसार केवळ 1,285 हेक्टर क्षेत्रावर भूसंपादन होणार आहे. या बदलामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून प्रशासन आणि ग्रामस्थांमधील विश्वास अधिक बळकट झाला आहे. प्रशासनाचे अंतिम उद्दिष्ट सुमारे 3,000 एकर जमिनीचे संपादन करणे आहे, त्यापैकी अर्ध्याहून अधिक जमीन मंजूर झाली आहे.
advertisement
विमानतळासाठी वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी आणि खानवडी या सात गावांचा समावेश आहे. 26 ऑगस्टपासून प्रशासनाकडून संमतीपत्रे स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुंजवडीमध्ये एकूण 76 हेक्टर जमिनीची आवश्यकता असून त्यातील 70 हेक्टरसाठी शेतकऱ्यांनी आधीच संमती दिलेली आहे. त्यामुळे या गावात संपादन प्रक्रियेला जवळजवळ पूर्णत्व आले आहे.
शेतकऱ्यांना संमतीपत्रे सादर करण्यासाठी 18 सप्टेंबरपर्यंतची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाला विश्वास आहे की उर्वरित शेतकरीही या कालावधीत आपली संमती देतील. कमी क्षेत्रात भूसंपादन करण्याचा निर्णय, पारदर्शक प्रक्रिया आणि योग्य मोबदल्याची हमी यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्याचा मार्ग आता अधिक मोकळा झाला आहे.
advertisement
या विमानतळामुळे पुणे जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे हवाईतळ मिळणार असून, उद्योग, पर्यटन आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने मोठी उडी घेता येईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ग्रामस्थ, प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वय या प्रकल्पाच्या यशासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Pune Airport Update : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! दुसऱ्या विमानतळाच्या उभारणीसाठी प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement