Rakshabandhan 2025: लाडक्या बहिणींना मिळणार खास गिफ्ट, एक महिना मोफत प्रवास अन् पैठणी, कुठं करायचा अर्ज?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Rakshabandhan 2025: लाडक्या बहिणींसाठी पुणे महानगर परिवहन खास गिफ्ट योजना जाहीर केलीये. पैठणी आणि एक महिन्याचा मोफत प्रवास योजनेबाबत जाणून घेऊ.
पुणे : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पीएमपी महिला प्रवाशांसाठी खास सरप्राइज घेऊन आली आहे. 9 ऑगस्ट रोजी पीएमपीच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना पैठणी आणि एक महिन्याचा मोफत बस पास जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या दिवशी प्रवास करणाऱ्या प्रत्येक महिला प्रवाशाला संगणकीकृत सोडतीत सहभागी होण्याची संधी मिळणार असून, विजेत्यांची घोषणा लवकरच केली जाणार आहे.
दिवसाला लाखो महिला प्रवासी
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रात दररोज अंदाजे 10 ते 11 लाख प्रवासी पीएमपीच्या बसेसमधून प्रवास करतात. यापैकी तब्बल 4 ते 5 लाख महिला प्रवासी आहेत. महिलांना सुरक्षित, सोयीस्कर आणि किफायतशीर सेवा देण्यावर पीएमपीचा नेहमी भर राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर राखी पौर्णिमेनिमित्त महिला प्रवाशांना विशेष मान देण्यासाठी ही लकी ड्रॉ योजना राबवली जात आहे.
advertisement
असा घ्या योजनेत सहभाग
या योजनेत सहभागी होण्यासाठी महिला प्रवाशांनी बसमध्ये लावलेला क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. स्मार्टफोन नसल्यास वाहकाकडून कुपन घेऊन आवश्यक माहिती भरून ते बसमध्ये ठेवलेल्या बॉक्समध्ये जमा करता येईल. एका तिकिटासाठी एकाच मोबाईल नंबरवरून केवळ एकदाच सहभाग नोंदवता येईल आणि त्या दिवशी प्रत्यक्ष प्रवास करणे आवश्यक असेल. तिकीट प्रिंटेड, दैनंदिन पास, यूपीआय किंवा मोबाइल अॅपवरून घेतलेले असू शकते.
advertisement
17 भाग्यवान महिलांना बक्षीस
view commentsसंगणकीकृत सोडतीद्वारे एकूण 17 महिला विजेत्यांची निवड केली जाणार आहे. प्रत्येक विजेत्याला आकर्षक पैठणीसह एक महिन्याचा मोफत बस पास प्रदान केला जाणार आहे. या योजनेत पीएमपीचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सहभागी होता येणार नाही. या उपक्रमाची संकल्पना पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी मांडली असून, प्रशासनाकडून विजेत्यांची नावे आणि सोडतीची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे सांगितले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 08, 2025 10:52 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Rakshabandhan 2025: लाडक्या बहिणींना मिळणार खास गिफ्ट, एक महिना मोफत प्रवास अन् पैठणी, कुठं करायचा अर्ज?


