advertisement

Pune Metro: आता गाडी बिनधास्त बाजूला लावा अन् मेट्रोनं सुसाट जा! पुणे पालिकेचा प्रवाशांसाठी मास्टरप्लॅन; पार्किंगचं 'नो टेन्शन'

Last Updated:

पालिकेच्या प्रकल्प विभागाने एकूण ३४ जागांची पाहणी केली असून, त्यातील ३१ जागा पार्किंगसाठी योग्य असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.

पुणे पालिकेचा पार्किंगसाठी प्लॅन (फाईल फोटो)
पुणे पालिकेचा पार्किंगसाठी प्लॅन (फाईल फोटो)
पुणे : पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या लाखो पुणेकरांची सर्वात मोठी डोकेदुखी आता कायमची मिटणार आहे. मेट्रो स्टेशनपर्यंत स्वतःच्या वाहनाने जाणाऱ्या प्रवाशांना गाडी पार्क करण्यासाठी जागा मिळत नसल्याने अनेकजण मेट्रो प्रवास टाळत होते. यावर तोडगा काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेने (PMC) कंबर कसली आहे. मेट्रो स्थानकांच्या ५०० मीटर परिसरात तब्बल ३१ नवीन पार्किंग झोन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
नेमका प्लॅन काय?
शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी पालिकेने मेट्रो स्थानकांलगतच्या 'ॲमेनिटी स्पेस'चा शोध घेतला आहे. पालिकेच्या प्रकल्प विभागाने एकूण ३४ जागांची पाहणी केली असून, त्यातील ३१ जागा पार्किंगसाठी योग्य असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. हे सर्व पार्किंग लॉट्स मेट्रो स्टेशनपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर (TOD झोनमध्ये) असतील, जेणेकरून प्रवाशांना चालत स्टेशन गाठणे सोपे होईल.
advertisement
१.५ ते २ लाख प्रवाशांना दिलासा
सध्या वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर दररोज दीड ते दोन लाख पुणेकर प्रवास करत आहेत. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग सुरू झाल्यावर ही संख्या आणखी वाढणार आहे. अशावेळी प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी पार्किंग अनिवार्य असल्याचे वारंवार समोर आले होते. त्यानुसार, महापालिका आणि महामेट्रोने संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे.
advertisement
लवकरच सुविधा उपलब्ध
प्रकल्प विभागप्रमुख दिनकर गोजारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ पैकी ४ ठिकाणे आधीच पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उर्वरित २७ जागांच्या विकासाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे रस्तेवर होणारी अनधिकृत पार्किंग कमी होऊन वाहतूक कोंडीतूनही पुणेकरांची सुटका होईल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro: आता गाडी बिनधास्त बाजूला लावा अन् मेट्रोनं सुसाट जा! पुणे पालिकेचा प्रवाशांसाठी मास्टरप्लॅन; पार्किंगचं 'नो टेन्शन'
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement