Kitchen Hacks : घरातील गव्हाला अजिबात लागणार नाही किडे! साठवण्यासाठी वापरा शेतकऱ्यांची 'ही' ट्रिक
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Wheat storage tips to avoid insects : अनेकजण महिनाभराचे किंवा दोन तीन महिन्यांचे गहू एकत्र खरेदी करतात आणि ते घरी आणून साठवतात. शेतकरी तर शेतात पिकवलेले गहू काढल्यानंतर अनेक दिवस घरात साठवून ठेवतात. तुम्ही देखील असे करत असाल असाल तर अनेकदा त्याला किडे लागल्याचे तुम्ही पाहिले असतील. हे किडे काही दिवसांत संपूर्ण गहू खराब करू शकतात. त्यामुळे या कीटकांना काढून टाकण्यासाठी काहीजण रसायनांचा वापर करतात. परंतु ते आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही काही काही सोप्या आणि नैसर्गिक पर्याय वापरून गहू नैसर्गिकरित्या सुरक्षित ठेवू शकता.
गव्हाला लागणारे भुंगे हे लहान कीटक असतात आणि ते गव्हाच्या दाण्यांमध्ये छित्रे पाटून अंडी घालतात आणि हळूहळू संपूर्ण धान्य पोकळ करतात. ओलावा किंवा बंद डब्यात थोडासा ओलावा असेल तर बराच काळ साठवलेल्या धान्याला भुंगे लागू शकतात. गव्हात तर हे अतिशय सामान्य आहे. या समसेवर शेतकरी तज्ञ पूरण जोशी यांनी एक भूतकाळातील अनुभव शेअर केला आहे. त्यांनी यासाठी काही टिप्स देखील सांगितल्या आहेत. या टिप्सचे पालन केल्यास तुमचा गहू सहज किडे लागण्यापासून वाचू शकतो. आजही ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी गहू साठवण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो.
advertisement
तुम्हाला गव्हात भुंग्यांचा थोडासाही प्रादुर्भाव दिसला तर ते 2 ते 3 तासांसाठी कडक सूर्यप्रकाशात एखाद्या कपड्यावर पसरवा. सूर्याची उष्णता भुंगे आणि त्यांची अंडी नष्ट करते. स्वच्छ कापडावर किंवा प्लास्टिकच्या शीटवर पातळ थर करून धान्य अशाप्रकारे पसरवा जेणेकरून सूर्यप्रकाश प्रत्येक दाण्यापर्यंत पोहोचेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ग्रामीण भागातील शेतकरी दर 15 ते 20 दिवसांनी धान्य तपासण्याची शिफारस करतात. तुम्हाला ओलावा किंवा कीटक दिसले तर ते ताबडतोब उन्हात वाळवा. योग्य काळजी घेतल्यास गहू बराच काळ सुरक्षित आणि ताजा राहतो. योग्य प्रकारे गहू साठवल्यास तो वर्षभर सहज वापरता येतो. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.)










