T20 World Cup : अभिषेक शर्माला सेमी फायनलमधून डच्चू? प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण... वानखेडेवरून आली मोठी अपडेट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपची दुसरी सेमी फायनल आज संध्याकाळी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात हा सेमी फायनलचा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे.
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपची दुसरी सेमी फायनल आज संध्याकाळी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात हा सेमी फायनलचा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे, पण या सामन्याआधी टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्माचा फॉर्म हा चिंतेचा विषय बनला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलमधून अभिषेक शर्माला डच्चू मिळणार का? अशा चर्चा सुरू आहेत. या सगळ्याबाबत टीम इंडियातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
अभिषेक शर्मासाठी सेमी फायनलचा दिवस नवीन पान आहे. तो या संधीचा फायदा नक्की घेईल, असा विश्वास टीम इंडियाचा बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्कल याने व्यक्त केला आहे.
मॉर्ने मॉर्कल याने अभिषेक शर्माच्या इंग्लंडविरुद्धच्या कामगिरीची आठवण देखील करून दिली. याआधी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माने शतक झळकावलं होतं. या मॅचपासून अभिषेकने प्रेरणा घेतली पाहिजे, असं मॉर्कल म्हणाला आहे. तसंच मॉर्कलने अभिषेकला निर्भयपणे खेळण्याचा सल्ला दिला आहे. अभिषेकच्या बॅटिंग टेकनिकमध्ये कोणतेही दोष नाहीत, अभिषेकच्या बॅटमधून दोन चांगले शॉट लागले तर तो फॉर्ममध्ये येईल, असा विश्वास मॉर्कलने व्यक्त केला आहे.
advertisement
दरम्यान मॉर्ने मॉर्केलने संजू सॅमसनचेही कौतुक केले. 'संजूने एका महत्त्वाच्या सामन्यात त्याचा अनुभव आणि दर्जा दाखवला. संधी मिळताच स्वतःला सिद्ध करण्यासाठी नेहमी तयार राहायला पाहिजे, संजूने ते करून दाखवलं, अशी प्रतिक्रिया मॉर्कलने दिली आहे.
वानखेडेवर होणार मोठा स्कोअर
वानखेडेची खेळपट्टी पाहून मॉर्कलने सेमी फायनलमध्ये मोठा स्कोअर होईल, असं भाकीत वर्तवलं आहे. उष्णतेमुळे अचूक अंदाज बांधणं अवघड आहे, पण मोठ्या स्कोअरसाठी आम्ही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया मॉर्कलने दिली.
advertisement
फिल्डिंग सुधारण्याची गरज
मॉर्केलने टीमच्या फिल्डिंगमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याची कबुलीही दिली. 'आम्ही मैदानावर 15 ते 20 जास्त रन देत आहोत. खेळाडूंना या क्षेत्रात अतिरिक्त मेहनत करण्याची आवश्यकता आहे, असं मॉर्कल म्हणाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 05, 2026 7:31 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : अभिषेक शर्माला सेमी फायनलमधून डच्चू? प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण... वानखेडेवरून आली मोठी अपडेट!









