advertisement

मुळशीत मासेमारीसाठी गेलेले शंकर अचानक बेपत्ता; 20 तासांनी भल्या पहाटे समोर आलं धक्कादायक सत्य

Last Updated:

मुलखेड गावाच्या हद्दीत राहणारे शंकर श्रीपती मोरे (वय ६५) यांचा मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय होता. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ते मासे पकडण्यासाठी मुळा नदीच्या पात्रात गेले होते

वृद्धाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (AI Image)
वृद्धाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (AI Image)
पुणे : मुळशी तालुक्यातील मुलखेड परिसरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुळा नदीच्या पात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली असून, तब्बल २० तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
पाण्याचा अंदाज चुकला आणि...
मुलखेड गावाच्या हद्दीत राहणारे शंकर श्रीपती मोरे (वय ६५) यांचा मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय होता. नेहमीप्रमाणे शुक्रवारी (३० जानेवारी) सकाळी ते मासे पकडण्यासाठी मुळा नदीच्या पात्रात गेले होते. मात्र, नदीपात्रातील पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडाले. काठावरील नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने मदतीसाठी पाचारण केले.
advertisement
२० तासांची थरारक शोधमोहीम
घटनेची माहिती मिळताच मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती आणि 'पीएमआरडीए'च्या (PMRDA) अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. शुक्रवारी सकाळपासून नदीपात्रात शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र, पाण्याचा प्रवाह आणि अंधारामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. अखेर शनिवारी पहाटे, २० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर शंकर मोरे यांचा मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले.
advertisement
परिसरात हळहळ
शंकर मोरे हे अनुभवी मासेमार होते, मात्र काळाने त्यांच्यावर अशा प्रकारे झडप घातल्याने मुलखेड परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
मुळशीत मासेमारीसाठी गेलेले शंकर अचानक बेपत्ता; 20 तासांनी भल्या पहाटे समोर आलं धक्कादायक सत्य
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement