Pune Hinjewadi : 'हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घाला...', सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा, म्हणाल्या 'नाहीतर गणपतीनंतर...'

Last Updated:

Supriya Sule On Hinjewadi : हिंजवडीमधील अवजड वाहनाच्या धडकेत 11 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे

Supriya Sule On Hinjewadi
Supriya Sule On Hinjewadi
Supriya Sule On Hinjewadi Acident  : हिंजवडीमधील अवजड वाहनाच्या धडकेत 11 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून हिंजवडीमधून ट्रॅफिकचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच आता अपघातानंतर सुप्रिया सुळे यांनी हिंजवडीकडे लक्ष घालण्याचा इशारा दिला आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

हिंजवडीमध्ये डंपर ट्रक आणि आरएमसी ट्रक नियमबाह्य वेळेत रस्त्यावर धावतात, निवासी भागात आरएमसी प्लांट आहेत, पीएमआरडीएने मोकळ्या केलेल्या रस्त्यांवर अजूनही स्क्रॅप, राडारोडा आहे तसेच रस्त्यावरील खड्डे अजूनही बुजवण्यात आलं नाही. हिंजवडीमध्ये कोट्यावधी रुपयाचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय होतो, इथून कंपन्या परराज्यात जात आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
advertisement

सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा

मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करते की, हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घाला, अशी विनंती देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे. अन्यथा गणपतीनंतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार

advertisement
दरम्यान, अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अॅक्टिव झाले आहेत. विशेष: अजित पवार हिंजवडीमधील कोंडी सोडवण्यासाठी पुढाकार घेताना दिसतायेत. अजित पवार यांनी विकास कामांची गती वाढण्याचा सुचना देखील दिल्या आहेत. अशातच आता येत्या काही दिवसात सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार अशी जुगलबंधी पहायला मिळू शकते.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Hinjewadi : 'हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घाला...', सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा, म्हणाल्या 'नाहीतर गणपतीनंतर...'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement