पुण्यातील पत्की दुहेरी हत्या प्रकरण; जन्मठेप झालेल्या आरोपींची 15 वर्षानी निर्दोष मुक्तता, कोर्टात जे घडलं ते चकित करणारं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
महत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बसप्पा धोत्रे यांनी आरोपींना ओळखल्याचा दावा केला होता. मात्र, बचाव पक्षाने पुराव्यासह सिद्ध केले की, धोत्रे यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यांची दृष्टी कमकुवत होती.
पुणे: पुण्यातील कर्वेनगर भागात झालेल्या स्मिता पत्की आणि सुलभा पाच्छापूरकर या दोन महिलांच्या दुहेरी खून खटल्याला आता १५ वर्षांनंतर मोठे वळण मिळाले आहे. कनिष्ठ न्यायालयाने ज्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, त्या आरोपींची पुराव्याअभावी मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भारती चांडक आणि भारती डोंगरे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
काय होते प्रकरण?
कर्वेनगर येथील राहत्या घरात घुसून स्मिता पत्की आणि सुलभा पाच्छापूरकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. केवळ हत्याच नव्हे, तर घरातील सोन्याचे दागिनेही लुटण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी अंबादास श्रीपाद जाधव, बंटी उर्फ गौरव गौतम वडवेराव आणि पंड्या उर्फ पांडुरंग अतुल जाधव यांना अटक केली होती. कनिष्ठ न्यायालयाने १३ साक्षीदारांच्या जबाबावरून आरोपींना दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
advertisement
कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. सुनावणी दरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी (अॅड. ऋषिकेश शिंदे, ॲड. रविराज सरवदे, ॲड. अनिता अग्रवाल आणि ॲड. फरहाना शाह) तपासातील अनेक गंभीर त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या
ओळख परेडमधील दिरंगाई: घटनेनंतर तब्बल ५ ते ६ महिन्यांनी आरोपींची ओळख परेड घेण्यात आली, जी कायदेशीरदृष्ट्या संशयास्पद मानली गेली. तसेच, जप्त केलेल्या दागिन्यांचीही योग्य ओळख परेड झाली नव्हती. महत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बसप्पा धोत्रे यांनी आरोपींना ओळखल्याचा दावा केला होता. मात्र, बचाव पक्षाने पुराव्यासह सिद्ध केले की, धोत्रे यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यांची दृष्टी कमकुवत होती. अशा परिस्थितीत ६ महिन्यांनी आरोपींना ओळखणे अशक्य असल्याचे न्यायालयाने मान्य केले.
advertisement
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की आरोपींविरुद्धचे पुरावे पुरेसे नाहीत. पुराव्यांची साखळी पूर्ण होत नसल्याने न्यायालयाने आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले. सरकारी पक्षातर्फे ॲड. एस. आर. नगरकर यांनी काम पाहिले. या निकालामुळे १५ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या आरोपींची मुक्तता झाली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 25, 2025 6:49 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील पत्की दुहेरी हत्या प्रकरण; जन्मठेप झालेल्या आरोपींची 15 वर्षानी निर्दोष मुक्तता, कोर्टात जे घडलं ते चकित करणारं









