Pune PCM Election : वनराजची पत्नी कोट्यावधींची मालकीन, आंदेकर कुटूंबाची एकूण संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रातून आकडा आला समोर!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune PCM Election Sonali Andekar Net Worth : सोनाली आंदेकरच्या कुटूंबाची एकूण मालमत्ता 1, 29,42,957 रुपये असल्याची माहिती समोर प्रतिज्ञापत्रानुसार समोर आली आहे.
Sonali Andekar Wealth Reveal in Affidavit : आगामी पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभू्मीवर पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 मध्ये तगडी फाईट पहायला मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 23 मध्ये आता धंगेकर विरुद्ध आंदेकर असा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. शिवसेनेकडून रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर निवडणूक मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्या विरोधात सोनाली आंदेकर उभी राहिल्या आहेत. पण सोनालीने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. अशातच आता निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आंदेकर कुटूंबाची संपत्ती समोर आली आहे.
3 तोळं सोन्याचं मंगळसुत्र, 3 लाथ 93 हजाराच्या बांगड्या
सोनाली आंदेकरच्या प्रतिज्ञापत्रानुसार तिच्याकडे 62,150 रुपये कॅश स्वरुपात आहेत. सोनाली आंदेकरच्या इंडियन बॅकेमध्ये 23 लाख रुपये असल्याची माहिती समोर आलीये. तसेच यूनियन बँकेत 93,740 रुपये एवढंच नाही तर इंडियन बँकेतील आणखी एका खात्यात 10,000 रुपये आहेत. तसेच महेश महिला पतसंस्थेत 5-5 लाखाच्या चार ठेवी आहेत. त्याची किंमत 20 लाख होते. तसेच एक अॅक्टिवा गाडी आहे. सोनालीकडे 3 तोळं सोन्याचं मंगळसुत्र आणि 3 लाथ 93 हजाराच्या बांगड्या आहेत. वनराज असोसिएटस् या फर्ममध्ये दोन लाखाची गुंतवणूक देखील आहे.
advertisement
71 लाख 71 हजार रुपयांची मालमत्ता
एवढंच नाही तर सोनाली आंदेकरच्या नावावर 71 लाख 71 हजार रुपयांची मालमत्ता खरेदी देखील आहे. सोनाली आंदेकरच्या कुटूंबाचं वार्षिक उत्पन्न 62,150 रुपये दाखवण्यात आलंय. तर कुटूंबाची जंगम मालमत्ता 57,71,740 रुपये दाखवण्यात आला आहे. तसेच आंदेकर कुटूंबाची स्थावर मालमत्ता ही 71,71,217 रुपये दाखवण्यात आलीये. त्यामुळे सोनाली आंदेकरच्या कुटूंबाची एकूण मालमत्ता 1, 29,42,957 रुपये असल्याची माहिती समोर प्रतिज्ञापत्रानुसार समोर आली आहे.
advertisement
कुटूंबाची संपत्ती 13865638 रुपये
दरम्यान, सोनाली आंदेकरच्या कुटूंबात फक्त दोन मुलं आणि मयत वनराज आंदेकरचा उल्लेख करण्यात आला आहे. तर दुसरीकडे बंडू आंदेकरची पत्नी लक्ष्मी आंदेकर देखील निवडणुकीच्या रिंगणात असल्याने तिच्या कुटूंबाची संपत्ती 1,38,65,638 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 1:43 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune PCM Election : वनराजची पत्नी कोट्यावधींची मालकीन, आंदेकर कुटूंबाची एकूण संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रातून आकडा आला समोर!











