पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; रिक्षात बसू न दिल्याने चालकावर सपासप वार, एवढ्यावरही थांबले नाहीत, अन्...

Last Updated:

पिंपरी-चिंचवड शहरातून एक धक्कादायक गुन्हेगारीची घटना समोर आली आहे. यात रिक्षात बसू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

रिक्षाचालकावर हल्ला
रिक्षाचालकावर हल्ला
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातून एक धक्कादायक गुन्हेगारीची घटना समोर आली आहे. यात रिक्षात बसू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. चिंचवडमधील शिवाजी चौकात शनिवारी रात्री ही थरारक घटना घडली. या हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, आरोपींनी त्याला लुटलं देखील आहे.
शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून आणि लगतच्या औद्योगिक नगरीतून समोर येणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांनी सगळ्यांनाच हादरवून टाकलं आहे. क्षुल्लक वादातून थेट कोयते काढण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली असून, शहरात कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. विशेषतः तरुण पिढीमध्ये वाढणारी ही हिंसक प्रवृत्ती चिंतेचा विषय ठरत आहे.
advertisement
याप्रकरणी गजानन जगदेव इंगळे (वय २४, रा. चिखली) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश महादेव पुजारी (वय १८) आणि उत्कर्ष हनुमंत गुंडे (वय १८) या दोन तरुणांनी गजानन यांना त्यांच्या रिक्षातून आनंदनगर येथे सोडण्याची मागणी केली होती. मात्र, गजानन यांनी त्यांना रिक्षात बसवण्यास नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी गजानन यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. मारहाण केल्यानंतर आरोपींनी गजानन यांच्याकडील रोख रक्कमही जबरदस्तीने हिसकावून नेली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; रिक्षात बसू न दिल्याने चालकावर सपासप वार, एवढ्यावरही थांबले नाहीत, अन्...
Next Article
advertisement
US Attack Venezuela Gold Price: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदाजाने गुंतवणूकदारांची झोप उडणार!
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदा
  • अमेरिकेने व्हेनेझुएला देशावर हल्ला करत राष्ट्रपती मादुरो यांना अटक केली.

  • व्हेनेझुएला हा देश सर्वाधिक तेल उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक

  • अमेरिकेच्या हल्ल्याचे परिणाम बाजारावरही होणार असल्याचे संकेत

View All
advertisement