advertisement

Pune PMC Mayor : मंजुषा नागपुरे पुण्याच्या नव्या महापौर, पुण्यात अजितदादांनी दिलेला शब्द राष्ट्रवादीने पाळला!

Last Updated:

Pune PMC Mayor Manjusha Nagpure : पुणे महानगरपालिकेवर भाजपने भगवा फडकवल्यानंतर आता मंजुषा नागपुरे या पुण्याच्या नव्या महापौर होणार आहेत.

Pune PMC Mayor Manjusha Nagpure
Pune PMC Mayor Manjusha Nagpure
Pune PMC New Mayor (वैभव सोनवणे, प्रतिनिधी) : पुणे महानगरपालिकेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तगडी फाईल निवडणुकीत पहायला मिळाली. पण अखेर भाजपने झेंडा फडकवला आणि राष्ट्रवादीला मात खावी लागली. अशातच आता सलग तिसऱ्यांदा नगरसेविका ठरलेल्या मंजुषा नागपुरे यांच्या गळ्यात पुण्याच्या नव्या महापौरपदाची माळ बांधण्यात आली आहे. तर परशुराम वाडेकर उपमहापौर होणार आहेत. सिंहगड रोड परिसरातील मंजुषा नागपुरे यांना आनंद गगनात मावेना झालाय. सलग तीन टर्म त्या नगरसेविका होत्या. अशातच आता त्यांना मोठा मान मिळालाय.

प्रभाग क्रमांक 35 मधून बिनविरोध

पुण्यात भाजपच्या दोन जागा बिनविरोध आल्या होत्या. प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिक बाग येथून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे आणि 35 ड मधून श्रीकांत जगताप हे दोन उमेवदार बिनविरोध निवडून आले होते. अशातच याच बिनविरोध निवडून आलेल्या मंजुषा नागपुरे यांना महापौरपद मिळालं आहे. अशातच पुण्यात अजितदादांनी दिलेला शब्द राष्ट्रवादीने पाळल्याचं पहायला मिळालं.
advertisement

अजितदादांचा शब्द राष्ट्रवादीने पाळला

पुण्यात जरी राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होती. देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होईल ठरलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत कोणताही उमेदवार दिला नाही अन् निवडणूक बिनविरोध झाली.

कोण आहेत मंजुषा नागपुरे?

भाजपच्या मंजुषा नागपुरे 2026 च्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या आहे. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने मतदानापूर्वीच त्यांचा विजय निश्चित झाला होता. राजकारणात येण्यापूर्वी त्या आयटी (IT) क्षेत्रात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्या सिंहगड रोड परिसरातील लोकप्रिय नेत्या असून, पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune PMC Mayor : मंजुषा नागपुरे पुण्याच्या नव्या महापौर, पुण्यात अजितदादांनी दिलेला शब्द राष्ट्रवादीने पाळला!
Next Article
advertisement
NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement