PMPML Bus: सार्वजनिक वाहतुकीचा कायापालट! पुणेकरांचा प्रवास सुसह्य होणार, PMPबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय

Last Updated:

शहराच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यानुसार लोकसंख्येच्या तुलनेत बसची संख्या खूपच कमी आहे. ही तूट भरून काढण्यासाठी पाऊलं उचलण्यात येत आहेत

News18
News18
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांची जीवनवाहिनी असलेल्या 'पुणे महानगर परिवहन महामंडळाला' (पीएमपी) आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. नवीन वर्षात प्रवाशांना अधिक वेगवान आणि सुरक्षित सेवा देण्यासोबतच, दैनंदिन महसूल ४ कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पीएमपीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती दिली. शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता सध्या ताफ्यात असलेल्या बसची संख्या अत्यंत तोकडी आहे, ज्याचा परिणाम बसच्या फेऱ्यांवर आणि पर्यायाने उत्पन्नावर होत आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी मार्च २०२६ पर्यंत ताफ्यात मोठ्या प्रमाणावर नवीन बसेस दाखल केल्या जाणार आहेत.
४ हजार बसेसचा टप्पा गाठणार:
शहराच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यानुसार लोकसंख्येच्या तुलनेत बसची संख्या खूपच कमी आहे. ही तूट भरून काढण्यासाठी पहिल्या टप्प्यात मार्च २०२६ च्या अखेरपर्यंत ताफ्यातील एकूण बसेसची संख्या ४ हजार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. बसेसची संख्या वाढल्यामुळे मार्गावरील फेऱ्यांची वारंवारता वाढेल, परिणामी प्रवाशांचा थांब्यावरील प्रतीक्षा वेळ कमी होईल. यामुळे खासगी वाहनांकडे वळलेला नागरिक पुन्हा सार्वजनिक वाहतुकीकडे वळेल, अशी प्रशासनाला आशा आहे.
advertisement
भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पीएमपी नवीन खरेदीमध्ये प्रदूषणमुक्त गाड्यांना प्राधान्य देणार आहे. यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रिक (E-Bus) आणि सीएनजी (CNG) बसेसचा समावेश असेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट झाल्यास शहरातील वाहतूक कोंडीची समस्या देखील सुटण्यास मदत होणार आहे. मार्चपर्यंत ४ हजार बसेसचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास केवळ उत्पन्नच वाढणार नाही, तर पुणेकरांना दर्जेदार आणि वेळेवर मिळणारी बससेवा उपलब्ध करून देणे शक्य होईल, असा विश्वास पंकज देवरे यांनी व्यक्त केला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
PMPML Bus: सार्वजनिक वाहतुकीचा कायापालट! पुणेकरांचा प्रवास सुसह्य होणार, PMPबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
KDMC Election: कल्याण-डोंबिवलीत युतीचे ११ उमेदवार बिनविरोध,  मनसे-ठाकरे गटासह काँग्रेसचा हातभार! पडद्यामागची Inside Story
कडोंमपात युतीचे ११ जण बिनविरोध, मनसेसह ठाकरे गटाचाही हातभार, Inside Story
  • कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाच्या युतीचे ११ उमेदवार बिनविरोध निव

  • बिनविरोध निवडणुकीमागे स्थानिक राजकारण, नेते महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे.

  • महत्वाची भूमिका मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी बजावली

View All
advertisement