Milk And Fruits : दुधात फळं टाकून का खाऊ नये, दुधासोबत फ्रुट्स खाल्ल्याने काय होतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Milk Fruits Combination Side Effects : हेल्दी म्हणून अनेक जण फ्रूट मिल्क, मिल्कशेक, स्मूदी घेतात. पण हेल्दी वाटणारी सवय प्रत्येकासाठी तितकीच योग्य असेलच असं नाही. फळं दुधासोबत घेतल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
आजकाल हेल्दी खाण्याच्या नावाखाली अनेकजण फ्रूट मिल्क, मिल्कशेक, स्मूदी घेतात. दूध आणि फळं दोन्ही पोषणमूल्यांनी भरपूर असली, तरी ही दोन पदार्थ एकत्र खाणं प्रत्येकासाठी फायदेशीरच असेल असं नाही. आयुर्वेद, पचनशास्त्र आणि आधुनिक आरोग्यतज्ज्ञांच्या मते काही फळं दुधासोबत घेतल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
advertisement
आयुर्वेदात दूध हे गुरु म्हणजे जड आणि शीत म्हणजे थंड आणि स्निग्ध मानलं जातं. तर फळं बहुतेक वेळा लघु म्हणजे हलकी, उष्ण किंवा आम्लीय असतात. या दोन्हींचा गुणधर्म वेगवेगळा असल्यामुळे दूध आणि काही फळं एकत्र घेतल्यास तो विरुद्ध आहार ठरतो. विशेषतः आंबट आणि आम्लीय फळं दूधासोबत टाळण्याचा सल्ला आयुर्वेद देतो.
advertisement
advertisement
दुधात प्रथिने आणि फॅट जास्त असल्यामुळे पचायला वेळ लागतो, फळात नैसर्गिक साखर फ्रक्टोज जास्त असल्यामुळे पटकन पचतात. जेव्हा हे दोन्ही एकत्र खाल्ले जातात, तेव्हा फळं लवकर पचण्याचा प्रयत्न करतात. दूध पोटात जास्त वेळ राहतं, त्यामुळे फळांची साखर फर्मेंट होते. याचा परिणाम गॅस, पोटात दुखणं, जुलाब किंवा बद्धकोष्ठता, मळमळ, उलटी असे त्रास होऊ शकतात, विशेषतः संवेदनशील पचन असलेल्या लोकांमध्ये.
advertisement
advertisement
advertisement










