advertisement

'दो भाई, दोनो तबाही', गुन्हेगारीचे रील बनवणाऱ्या दोघांचा पुणे पोलिसांनी उतरवला माज, थेट मुंडन करून...

Last Updated:

पुण्याच्या खडकी पोलिसांनी गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे रिल्स बनवणाऱ्या दोघांचा माज उतरवला आहे. त्यांचं मुंडन करून प्रक्षोभक रिल्स बनवल्याप्रकरणी माफी मागायला भाग पाडलं आहे.

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: मागील काही काळात पुण्यासह आसपासच्या परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतच चाललं आहे. अनेक ठिकाणी कोयता हल्ला, खून आणि हाणामारीच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी टोळीयुद्धातून आंदेकर टोळीने पुण्यात आयुष कोमकर आणि गणेश काळेची हत्या केली. यानंतर पुणे शहरासह जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.
advertisement
सोशल मीडियावर चिथावणीखोर आणि गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे रील बनवणाऱ्या तरुणांवर पोलिसांची करडी नजर आहे. दरम्यान, पुण्याच्या खडकी पोलिसांनी गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे रिल्स बनवणाऱ्या दोघांचा माज उतरवला आहे. त्यांचं मुंडन करून प्रक्षोभक रिल्स बनवल्याप्रकरणी माफी मागायला भाग पाडलं आहे. यानंतर त्यांनी दोन्ही घटनांचा एकत्रित व्हिडीओ बनवून व्हायरल केला आहे.
पुण्यातील खडकी भागात दोन तरुणांनी येरवडा जेल, दो भाई... दोनो तबाही.... जिंदगी खराब करून टाकेल... अशा प्रकारचे गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. या व्हिडिओमध्ये गुन्हेगारी प्रवृत्त करणारे वाक्य असल्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
advertisement
या व्हिडिओबद्दल खडकी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही तरुणांचा शोध घेण्याचं ठरवलं. गुप्त खबऱ्यांचा वापर करून त्यांनी दोघांना शोधून काढलं. तसेच पोलिसांनी दोन्ही तरुणांना ताब्यात घेत त्यांचं मुंडन करून त्यांना थेट कॅमेऱ्यासमोर माफी मागायला लावली. पुणे पोलिसांकडून सध्या अशा पद्धतीचे व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'दो भाई, दोनो तबाही', गुन्हेगारीचे रील बनवणाऱ्या दोघांचा पुणे पोलिसांनी उतरवला माज, थेट मुंडन करून...
Next Article
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement