Video : महाराष्ट्र केसरी बैलाचं अकाली निधन, लाडक्या खंड्याची मालकानं बांधली समाधी

Last Updated:

महाराष्ट्र केसरी, घाटाचा राजा या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या मावळमधील खंड्या बैलाचं अकाली निधन झालं.

+
महाराष्ट्र

महाराष्ट्र केसरी खंड्या बैलाचं अकाली निधन, मालकाने दशक्रिया विधी करून बांधली समाधी, Video

शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे: बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांचा जीव की प्राण आहे. बैलगाडा मालक हे बैलांचा आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करत आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळमधील नानोली गावातील शेतकरी राहुल जाधव यांनी देखील आपल्या खंड्या बैलाचा अगदी मुलाप्रमाणे सांभाळ केला होता. नुकतंच बैलगाडा शर्यतीत जिंकल्यावर खंड्या बैलाचं ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. त्यानंतर जाधव यांनी लाडक्या बैलाची समाधी बांधली आहे.
advertisement
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
आपल्या लाडक्या बैलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शर्यत पूर्ण करून घाटाचा राजाचा मान मिळवून खंड्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचे निधन झाले. खंड्या बैलाला शेवटचा निरोप देताना त्यांनी रितसर दशक्रिया विधी केला. इतकंच नाही तर खंड्या बैलाची समाधी उभारून विधीवत पूजा केली. त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील नानोली गावात जाधव या शेतकऱ्याने त्याच्या लाडक्या बैलाचा निधन झाल्यानंतर त्याचा दशक्रिया आणि उत्तरकार्य केलं आहे.
advertisement
घराशेजारीच बांधली समाधी 
बैलगाडा शर्यतीत खंड्या या बैलाने अनेक विक्रम केले. तर रांजणगाव, लोहगाव, चऱ्होली, सारख्या 65 हून अधिक ठिकाणी शर्यती जिंकल्या. तसेच महाराष्ट्र केसरी, घाटाचा राजा म्हणून नाव लौकिक खंड्या बैलाने मिळवला होता. मात्र शेवटच्या क्षणी खंड्या या बैलाने घाटाचा राजा होण्याचा मान मिळवला. या बैलाने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून त्याने आपल्या घराशेजारीच लाडक्या खंड्या बैलाचं निधन झालं. त्यानंतर दफन विधी केली आणि दहावा विधी आणि उत्तरकार्य देखील केले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
advertisement
दरम्यान, जाधव कुटुंबीयांनी 8 महिन्याचा असताना खंड्या हा बैल अंकुश जाधव यांच्याकडून खरेदी केला होता. त्यानंतर 5 वर्ष त्याचा पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. मात्र खंड्या बैलाच्या अकाली निधनामुळे जाधव कुटुंबियांवर शोककळा पसरलीय.
मराठी बातम्या/पुणे/
Video : महाराष्ट्र केसरी बैलाचं अकाली निधन, लाडक्या खंड्याची मालकानं बांधली समाधी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement