advertisement

Mumbai Metro 11अख्ख्या मुंबईला वळसा घालणार, कोणते असतील पाच नवे स्थानकं; कसा असेल नवा मार्ग?

Last Updated:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या राज्याच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात मेट्रो मार्गिका 11 मध्ये काही महत्त्वाचे बदल जाहीर केल्याची घोषणा केली. नव्या मार्गामध्ये पाच नव्या स्थानकांचा समावेश झाला असून 24.4 किमी इतका संपूर्ण प्रवास झाला आहे. मेट्रो 11 चा कसा असेल नवा मार्ग जाणून घेऊया?
1/6
मेट्रो कामाला गती 
मुंबई आणि उपनगरामध्ये मेट्रोचं जाळं दिवसेंदिवस अधिकाधिक विस्तारित जात आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई या शहरातही राज्य सरकारकडून मेट्रोचे जाळे अधिकच घट्ट विणले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मेट्रो मार्गिका 11 ची घोषणा केली होती.
advertisement
2/6
Devendra fadanvis
अलीकडेच सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांनी मेट्रो मार्गिका 11 मध्ये पाच नव्या स्थानकांची वाढ करण्यात आली आहे. 2025 मध्ये निश्चित करण्यात आलेल्या वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या प्रस्तावित मार्गिकेचा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये नव्या स्थानकांचा समावेश करण्यात आल्याची माहिती दिली.
advertisement
3/6
Pune Metro
ही भुयारी मेट्रो पूर्व- पश्चिम आणि उत्तर- दक्षिण अशा चारही विभागांना एकत्र जोडणार आहे. वडाळ्यापासून सुरू होणारी ही भुयारी मेट्रो गेट वे ऑफ इंडियापर्यंत म्हणजेच दक्षिण मुंबईपर्यंत धावणार आहे. मेट्रो मार्गिका 4 अर्थातच कासारवडवली ते वडाळा मार्गावर धावणाऱ्या मेट्रोला ही जोडली जाणार आहे. यामुळे ठाणे आणि पूर्व मुंबईतील प्रवाशांना दक्षिण मुंबईत पोहोचणे अधिक सोप्प होणार आहे.
advertisement
4/6
Kalyan-Taloja Metro 12
मुख्यमंत्र्यांनी पाच स्थानक यामध्ये नव्याने दाखल केले आहेत. त्यामध्ये, चुनाभट्टी, सायन, मध्य धारावी, वांद्रे पश्चिम आणि वांद्रे टर्मिनस अशा पाच नव्या स्थानकांचा समावेश होणार आहे. यापूर्वी या मार्गिकेवर अनिक बस डेपो, सीजीएस बस कॉलनी, गणेश नगर, बीपीटी रुग्णालय, शिवडी, हे बंदर, बंदर कोल, रे रोड, भायखळा, नागपाडा जंक्शन, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट, सीएसएमटी, हॉर्निमन सर्कल आणि एसपीएम सर्कल अशा 14 स्थानकांचा समावेश आहे.
advertisement
5/6
 पूर्वी 17.5 किमी इतका मार्ग होता, पण त्यात आता 6.9 किमीची भर पडली असून 15 स्थानकांवरून 20 स्थानकांची वाढ यामध्ये झालेली आहे. त्यामुळे आता हा एकूण मार्ग 24.4 किमी इतका झाला आहे. या मार्गिकेसाठी एकूण 23,487 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सरकारकडून मेट्रो 11 ला दुसऱ्या मेट्रोंसोबतही जोडणार आहे. त्यामुळे नोकरदारांना या माध्यमातून फार मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई उपनगरातील असो किंवा ठाण्यातील प्रवासी असो त्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

6/6
 मेट्रो 11 चे मार्ग, शिवडी आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाखालून भुयारी मार्गिका नेण्यात येणार आहे. त्यानंतर मिठी नदीपासून वांद्रे टर्मिनसपर्यंत मार्ग वाढवला जाणार आहे. शिवाय धारावी मेट्रो स्थानकावरून ही मार्गिका मेट्रो 3 ला ही जोडली जाणार आहे. त्यामुळे कुलाबा, बीकेसी आणि सीप्झला जाणं सोपं होईल. पुढे वांद्रे पश्चिम स्थानकावरून मेट्रो लाइन 2बी ला जोडलं जाणार आहे. शिवाय, कासारवडवली मेट्रोमुळे ठाण्यातील प्रवाशांनाही फायदा होणार आहे.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement