advertisement

डोळ्यांत अश्रू, हातात फोटो अन् अंगावर वर्दी; शहीद अनुज शर्मांच्या भावी पत्नीचा 'तो' व्हिडिओ पाहून देश हळहळला

Last Updated:

Funeral Of Anuj Sharma: अनुज शर्मा यांच्या अंत्यसंस्कारावेळी हरियाणातील ककराना गावात अत्यंत भावनिक वातावरण पाहायला मिळाले. वर्दीत उभी राहून हातात त्यांचा फोटो धरत अश्रूंनी निरोप देणाऱ्या त्यांच्या भावी पत्नीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

News18
News18
हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील ककराना गावात शनिवारी वातावरण अत्यंत हळवे आणि भावनिक झाले होते. हवेत धुराचे लोट होते, चितेच्या ज्वाळा उसळत होत्या आणि चारही बाजूंनी शांतता पसरली होती. गावातील अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते. मात्र सर्वांचे लक्ष एका महिलेकडे खिळले होते. ही महिला भारतीय वायुसेनेच्या वर्दीत शांतपणे उभी होती आणि त्यांच्या हातात शहीद स्क्वॉड्रन लीडर अनुज शर्मा यांचा फोटो होता.
या महिलेच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते. त्या वारंवार रुमालाने ते पुसण्याचा प्रयत्न करत होती. मात्र जेव्हा जेव्हा त्यांची नजर चितेकडे जात होती, तेव्हा चेहऱ्यावरची वेदना अधिक स्पष्ट दिसत होती. त्या अनुज शर्मा यांची होणारी पत्नी होती आणि योगायोगाने त्या स्वतःही भारतीय वायुसेनेत अधिकारी आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एकाच वेळी दु:ख आणि अभिमान असे दोन्ही भाव दिसत होते.
advertisement
अनुज शर्मा यांच्या भावी पत्नीचा हा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी आसाममध्ये झालेल्या सुखोई फायटर जेट अपघातात स्क्वॉड्रन लीडर अनुज शर्मा शहीद झाले.
गावात शोककळा
फायटर जेट दुर्घटनेनंतर जेव्हा अनुज शर्मा यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गाव ककराना येथे आणण्यात आले, तेव्हा संपूर्ण गावात शोककळा पसरली. शेकडो ग्रामस्थ त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. राजकीय सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
advertisement
या वेळी त्यांची भावी पत्नी वर्दीतच उपस्थित होती. त्यांच्या हातात अनुज यांचा फोटो होता, डोळ्यांत अश्रू होते; पण चेहऱ्यावर संयम होता. कदाचित फौजी असण्याचा अर्थ हाच असतो. मनात अपार वेदना, पण देशासाठी अभिमानही तितकाच. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनाला हा प्रसंग स्पर्शून गेला. कारण तो केवळ एका शहीद जवानाचा निरोप नव्हता, तर अपूर्ण राहिलेल्या प्रेमकथेचा वेदनादायी शेवटही होता.
advertisement
सन्मानाने अंत्यसंस्कार
स्क्वॉड्रन लीडर अनुज शर्मा भारतीय वायुसेनेतील धाडसी अधिकाऱ्यांपैकी एक होते. आसाममध्ये सुखोई फायटर जेट दुर्घटनेत त्यांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या निधानाची बातमी गावात पोहोचताच संपूर्ण परिसरात दु:खाचे वातावरण निर्माण झाले. अंत्यसंस्काराच्या वेळी गावातील मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दु:ख स्पष्ट दिसत होते. मात्र सर्वाधिक भावूक करणारा क्षण म्हणजे त्यांच्या भावी पत्नीचा होता, ज्या वर्दीत उभी राहून त्यांना अखेरचा निरोप देत होती.
advertisement
advertisement
छोट्या भावाने दिली मुखाग्नी
अंत्यसंस्काराच्या वेळी अनुज यांच्या लहान भावाने चितेला मुखाग्नी दिली. आई-वडिलांचे रडून वाईट हाल झाले होते. गावकरी शांतपणे उभे राहून हा क्षण पाहत होते. कुठेही गोंधळ किंवा आवाज नव्हता. फक्त चितेवर जळणाऱ्या लाकडांचा आवाज ऐकू येत होता. भावी पत्नी मात्र शांत उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण त्या तेथून गेल्या नाही. जणू त्या आपल्या प्रेमाला अखेरचा सलाम देत उभ्या होत्या.
advertisement
डोळ्यांत वेदना
अनुज शर्मा यांची भावी पत्नी स्वतः भारतीय वायुसेनेत अधिकारी आहे. त्यामुळे त्यांना लष्करातील जीवनातील धोके किती मोठे असतात, याची जाणीव आहे. मात्र जेव्हा प्रश्न आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीचा असतो, तेव्हा वेदना अधिक तीव्र होते.
दोघांच्या लग्नाची तयारी सुरू होती. भविष्यासाठी अनेक स्वप्ने होती. पण अचानक झालेल्या विमान अपघाताने सर्व काही बदलून गेले. त्यामुळे चितेसमोर उभ्या असलेल्या त्यांची शांतता आणि डोळ्यांतले अश्रू त्या खोल वेदनेचे प्रतीक होते, जी शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे.
वेदना आणि अभिमानाचा संगम
अनुज शर्मा यांच्या अखेरच्या निरोपाचा प्रसंग अनेकांच्या मनात कायमचा कोरला गेला. वर्दीत उभी असलेली त्यांची भावी पत्नी, हातात फोटो आणि समोर पेटलेली चिता हे दृश्य केवळ दु:खाचे नाही, तर अभिमानाचेही प्रतीक ठरले.
view comments
मराठी बातम्या/देश/
डोळ्यांत अश्रू, हातात फोटो अन् अंगावर वर्दी; शहीद अनुज शर्मांच्या भावी पत्नीचा 'तो' व्हिडिओ पाहून देश हळहळला
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement