Pune Theft : 66 लाखांच्या सिगारेट चोरी; रांजणगाव पोलिसांनी अवघ्या 72 तासांत असा लावला छडा

Last Updated:

सुपरवायझर यांची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. गोदामाचा सुपरवायझर प्रथमेश चव्हाण यानेच आपल्या दोन साथीदारांना हे वाहन चोरण्यासाठी मदत केल्याची कबुली दिली.

72 तासांत लावला चोरीचा छडा (AI Image)
72 तासांत लावला चोरीचा छडा (AI Image)
पुणे : रांजणगाव पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत एका मोठ्या चोरीचा छडा लावला. पोलिसांनी ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची मोठी कारवाई केली आहे. रांजणगाव एमआयडीसीमधील चमाडिया गोदामातून सिगारेट, बिस्किटे आणि साबण चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पुणे ग्रामीण पोलिसांनी केला आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील चमाडिया गोदामात आयटीसी (ITC) कंपनीचा माल साठवला जातो. हा माल डीलर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी मूव्हिंग लॉजिस्टिक्स प्रा. लि. कडे कंत्राट आहे. त्यांच्या इलेक्ट्रिक पिकअप वाहनांमध्ये रात्रीच माल भरून ठेवला जातो. १७ डिसेंबरच्या पहाटे एका अनोळखी चोरट्याने संधी साधून माल भरलेले इलेक्ट्रिक पिकअप वाहन थेट गेटमधून बाहेर काढले आणि सुमारे ६६ लाख रुपयांच्या सिगारेट आणि इतर वस्तूंची चोरी केली होती.
advertisement
७२ तासांत पोलिसांची मोठी कामगिरी
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे वाघोली परिसरात संशयित वाहनाचा शोध घेतला. तिथे एक वाहन हॉटेलसमोर माल उतरवताना आढळले. पोलिसांनी वाहनाचा चालक, मालक आणि सुपरवायझर यांची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. गोदामाचा सुपरवायझर प्रथमेश चव्हाण यानेच आपल्या दोन साथीदारांना (दीपक ढेरंगे आणि अल्ताफ मुल्ला) हे वाहन चोरण्यासाठी मदत केल्याची कबुली दिली.
advertisement
पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी प्रथमेश ज्ञानेश्वर चव्हाण (रा. वाघोली) याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण माल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील इतर दोन आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलिसांनी फत्ते केली.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Theft : 66 लाखांच्या सिगारेट चोरी; रांजणगाव पोलिसांनी अवघ्या 72 तासांत असा लावला छडा
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement