Buldhana Crime : पोटच्या मुलींना मृत्यूचा दारात ढकलून विवाहितेने संपवलं आयुष्य, पण चमत्कार घडला! वंशाला दिवा दिला नसल्याने होत होता छळ

Last Updated:

Buldhana Married woman ends life : कांचन अमोल सोनुने असे या मृत महिलेचे नाव असून तिने ३ वर्षांची आकांक्षा आणि केवळ ६ महिन्यांची प्रांजल यांना मृत्यूच्या दारात ढकलले होते.

Buldhana Crime Married woman ends life
Buldhana Crime Married woman ends life
Buldhana Crime News : लोणार तालुक्यातील वढव येथे एका २५ वर्षीय माऊलीने टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून संतापलेल्या या विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींना फासावर लटकवून स्वतःचे आयुष्य संपवले. सुदैवाने, नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते; गळफास तुटल्याने दोन्ही मुली खाली पडल्या आणि त्यांचे प्राण वाचले, मात्र त्यांच्या आईचा जागीच मृत्यू झाला.

मुलींच्या रडण्याचा आवाज अन्...

कांचन अमोल सोनुने असे या मृत महिलेचे नाव असून तिने ३ वर्षांची आकांक्षा आणि केवळ ६ महिन्यांची प्रांजल यांना मृत्यूच्या दारात ढकलले होते. घरातील अँगलला तिघींना लटकवल्यानंतर मुलींच्या रडण्याचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी धाव घेतली. दरवाजा तोडून आत पाहिले असता कांचन मृतावस्थेत होती, तर मुली खाली पडलेल्या आढळल्या. त्यांच्या गळ्यावर फासाचे वळ असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
advertisement

चारित्र्यावर संशय घेऊन माहेरून पैशांची मागणी

या आत्महत्येमागे सासरच्या मंडळींकडून होणारा छळ कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. 'वंशाचा दिवा दिला नाही' असे म्हणून कांचनला सतत हिणवले जात होते. तसेच चारित्र्यावर संशय घेऊन माहेरून पैशांची मागणी केली जात होती. गरीब परिस्थितीमुळे ही मागणी पूर्ण करू न शकल्याने कांचनचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असे, अशी तक्रार तिच्या आईने लोणार पोलीस स्टेशनला दिली आहे.
advertisement

नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी कांचनचा पती अमोल सोनुने, सासरा विश्वनाथ सोनुने आणि इतर नातेवाईकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. लोणार पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana Crime : पोटच्या मुलींना मृत्यूचा दारात ढकलून विवाहितेने संपवलं आयुष्य, पण चमत्कार घडला! वंशाला दिवा दिला नसल्याने होत होता छळ
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement