आंध्रातून रेल्वेनं यायच्या अन्...., छ. संभाजीनगरमध्ये महिलांचं मोठं कांड, दोघींसह दलाल जेरबंद

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: करमाड परिसरातील कुंभेफळ शिवारात एका कापडी झोपडीत दोन महिला असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

आंध्रातून रेल्वेनं यायच्या अन्...., छ. संभाजीनगरध्ये महिलांचं मोठं कांड, दोघींसह दलाल जेरबंद
आंध्रातून रेल्वेनं यायच्या अन्...., छ. संभाजीनगरध्ये महिलांचं मोठं कांड, दोघींसह दलाल जेरबंद
छत्रपती संभाजीनगर : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमहून येऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. रेल्वेमार्गे गांजा आणून शहर व ग्रामीण भागात विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी थेट कारवाई केली. यामध्ये दोन महिला तस्करांसह मुख्य दलालाला अटक करण्यात आली असून तब्बल 31 किलो 411 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
चंद्रकला ऊर्फ चंदाबाई शेषराव पवार (52), ध्रुपदा सुभाष मोहिते (55) आणि मुनीर खान हयात खान (45) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जिल्ह्यात अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएस पथक सतर्क झाले आहे.
advertisement
करमाड परिसरातील कुंभेफळ शिवारात असलेल्या एका कापडी झोपडीत दोन महिला गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे यांना मिळाली. करमाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मदतीने छापा टाकण्यात आला. या वेळी महिलांच्या ताब्यातून 21 किलो 495 ग्रॅम गांजा आढळून आला.
चौकशीत काही वेळापूर्वीच मुनीर खान हा गांजा खरेदी करून विक्रीसाठी गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शेकटा परिसरात त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून उर्वरित गांजाही जप्त करण्यात आला. ही कारवाई उपनिरीक्षक दिलीप चौरे, सहायक फौजदार विक्रम देशमुख, अंमलदार वाल्मीक निकम, श्रीमंत भालेराव, सोपान डकले, श्याम ढवळे, शकुल बनकर, राहुल पगारे, गणेश खरात आणि सरला कदम यांच्या पथकाने केली.
advertisement
चंद्रकला मूळ सिल्लोडची, ध्रुपदा बुलढाणा जिल्ह्यातील अंबेटाकळीची असून मुनीर खान हा कामानिमित्त राज्यभर फिरत असतो. रेल्वेत बांगड्या व किरकोळ वस्तू विकण्याच्या निमित्ताने त्यांनी गांजाच्या तस्करीकडे वळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विशाखापट्टणमहून गांजा खरेदी करून तो जिल्ह्यात विकला जात होता. ध्रुपदा हिच्यावर यापूर्वी 2022 मध्ये मेहकर पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विक्रीचा गुन्हा दाखल आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आंध्रातून रेल्वेनं यायच्या अन्...., छ. संभाजीनगरमध्ये महिलांचं मोठं कांड, दोघींसह दलाल जेरबंद
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement