भाडेकरू गाळा सोडेना; तणावात आजी गेली, संतापलेल्या नातवंडांनी केलं असं, पोलिसही चक्रावले
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: गाळा सोडण्यास सांगूनही भाडेकरू ऐकत नसल्याने दीर्घकाळ वाद सुरू होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, याच मानसिक तणावामुळे शकुंतला यांचे 24 डिसेंबर रोजी निधन झाले.
छत्रपती संभाजीनगर : भाडेकरूने मेडिकलचा गाळा रिकामा करण्यास वारंवार नकार दिल्याने सुरू असलेला वाद अखेर एका कुटुंबासाठी वेदनादायी ठरला. या तणावाच्या दरम्यानच मूळ मालक असलेल्या वृद्ध महिलेचे निधन झाले. अन्यायाने आणि संतापाने ग्रासलेल्या नातवंडांनी आजीचा मृतदेह थेट मेडिकलसमोर ठेवत आपली व्यथा व्यक्त केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिल कॉर्नर परिसरातील इमारतीच्या मालक शकुंतला बापूराव बोरसे यांनी आपला गाळा मेडिकल चालवण्यासाठी भाड्याने दिला होता. मात्र, गाळा सोडण्यास सांगूनही भाडेकरू ऐकत नसल्याने दीर्घकाळ वाद सुरू होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, याच मानसिक तणावामुळे शकुंतला यांचे 24 डिसेंबर रोजी निधन झाले. निधनानंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह भारत मेडिकलसमोर आणून आपला आक्रोश मांडला. काही राजकीय पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, पोलिस अंमलदार देवीदास वाडेकर यांनी धाव घेतली. मात्र, कुटुंबीयांनी जवळपास तासभर मृतदेह हलवला नाही.
advertisement
अखेर सिटी चौक पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवणे तसेच मृतदेहाची अवहेलना केल्याच्या आरोपाखाली कुटुंबातील दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. किरण राजू बोरसे, कपिल राजू बोरसे, श्याम राज बोरसे, कृष्णा राजू बोरसे, स्वप्नील दीपक बोरसे, करण अरुण बोरसे, नितीन गुलाब लिंगायत, लखन वसंत लिंगायत, लखन अरुण बोरसे व सनी गणेश दळवी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार सुधाकर मिसाळ करीत आहेत.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 11:35 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
भाडेकरू गाळा सोडेना; तणावात आजी गेली, संतापलेल्या नातवंडांनी केलं असं, पोलिसही चक्रावले









