मराठा समाजासाठी सारथी संस्था काय काम करते? पाहा संपूर्ण माहिती

Last Updated:

मराठा समाच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आलीय. या संस्थेच्या योजनांबाबत इथं पाहा.

+
मराठा

मराठा समाजासाठी सारथी संस्था काय काम करते? पाहा संपूर्ण माहिती

पुणे, 25 सप्टेंबर: मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या, युवा पिढीच्या प्रगतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे अर्थात सारथीची स्थापना करण्यात आली आहे.विविध पद्धतीने सारथीमार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसोबतच समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी,आर्थिक सक्षमीकरणासाठी व्यापक स्वरुपात उपक्रम,योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांविषयीची माहिती ‘सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्याकडून जाणून घेणार आहोत .
आठ विभागीय केंद्रांतून काम
'शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती’ हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या ‘सारथी’चे मुख्य कार्यालय पुणे येथे असून कोल्हापूर येथे उपकेंद्र आहे. संस्थेचे काम अधिक गतीने, सुलभरित्या होण्यासाठी कोल्हापूर उपकेंद्र, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, पुणे, नाशिक, मुंबई (खारघर नवी मुंबई) व लातूर अशी एकूण आठ विभागीय कार्यालये सुरु करण्यात आली आहेत, अशी माहिती ‘सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली.
advertisement
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लाभ
सारथीच्या माध्यमातून राज्यातील मराठा समजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी विविध कल्याणकारी उपक्रम, योजना व्यापक स्वरुपात राबवण्यात येत आहेत. राज्यातील 1 लाख 33 हजार 236 विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे. पीएच.डी विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती विभागात 2 हजार 109 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण विभागात 25 हजार 107 तर शिक्षण विभागातंर्गतच्या योजनांचा 25 हजार 137 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. तर कौशल्य विकास प्रशिक्षण विभागांतर्गत 20 हजार 743 लाभार्थ्यांना तर सारथीच्या इतर उपक्रमातंर्गत 60 हजार 140 जणांना लाभ झालेला आहे, असे काकडे यांनी सांगितले.
advertisement
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांविषयी मार्गदर्शन
‘सारथी’ संस्थेमार्फत नवी दिल्ली व पुणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेत 500 विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येते. प्रशिक्षण संस्थेचे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क ‘सारथी’ मार्फत देण्यात येते.
advertisement
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी मदत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा राजपत्रित, न्यायिक सेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषि सेवा, वन सेवा इत्यादी परीक्षांविषयी ‘सारथी’मार्फत प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण संस्थेचे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क ‘सारथी’मार्फत देण्यात येते. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक मदत दिली जाते. अशी माहिती ‘सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
मराठा समाजासाठी सारथी संस्था काय काम करते? पाहा संपूर्ण माहिती
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement