पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ, देवालाही सोडलं नाही; शिवाजीनगरमधील मंदिरात चोरीचा थरार

Last Updated:

चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी देवीच्या मूर्तीवरील मुकूट चोरला

देवीच्या मूर्तीवरील मुकूट चोरला (AI Image)
देवीच्या मूर्तीवरील मुकूट चोरला (AI Image)
पुणे : पुणे शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या शिवाजीनगर भागात एका प्रसिद्ध मंदिरात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून देवीचा चांदीचा मुकुट लंपास केला आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
नेमकी घटना काय?
शिवाजीनगर गावठाण परिसरात मांढरदेवी काळूबाईचे प्राचीन मंदिर आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा संपूर्ण परिसर शांत होता, तेव्हा चोरट्यांनी मंदिराला लक्ष्य केले. चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी देवीच्या मूर्तीवरील सुमारे ३० हजार रुपये किमतीचा चांदीचा मुकुट चोरून नेला. शनिवारी सकाळी मंदिर उघडल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.
advertisement
याप्रकरणी मंदिर प्रशासनाच्या वतीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित बढे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
advertisement
पुण्यातील गर्दीच्या आणि मध्यवर्ती भागात असलेल्या मंदिरात अशा प्रकारे चोरी झाल्याने मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
रिक्षाचालकाला लुटलं 
पिंपरी-चिंचवड शहरातून आणखी एक धक्कादायक गुन्हेगारीची घटना समोर आली आहे. यात रिक्षात बसू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. चिंचवडमधील शिवाजी चौकात शनिवारी रात्री ही थरारक घटना घडली. या हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, आरोपींनी त्याला लुटलं देखील आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ, देवालाही सोडलं नाही; शिवाजीनगरमधील मंदिरात चोरीचा थरार
Next Article
advertisement
US Attack Venezuela Gold Price: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदाजाने गुंतवणूकदारांची झोप उडणार!
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदा
  • अमेरिकेने व्हेनेझुएला देशावर हल्ला करत राष्ट्रपती मादुरो यांना अटक केली.

  • व्हेनेझुएला हा देश सर्वाधिक तेल उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक

  • अमेरिकेच्या हल्ल्याचे परिणाम बाजारावरही होणार असल्याचे संकेत

View All
advertisement