advertisement

विधवा आईचा मित्रच निघाला नराधम! शाळेत सोडतो म्हणाला अन् पुण्यात चिमुरडीवर केला पाशवी अत्याचार

Last Updated:

लैंगिक अत्याचार केल्याचे कोणाला सांगितलं तर बघून घेतो अशी धमकी देखील तेरा वर्षीय मुलीला दिली.

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे :  पुण्यात पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आलाय. मी तुला शाळेत सोडतो असं सांगून एका 32 वर्ष विधवा आईच्या 29 वर्षीय मित्राने तिच्या 13 वर्षीय मुलीवर भर रस्त्यात गाडी लावून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी वारजे पोलीस स्टेशनमध्ये आईने तक्रार दाखल केली असून वारजे पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. ज्ञानेश्वर रायरीकर असं 29 वर्षे आरोपीचे नाव आहे.
advertisement
पीडित मुलीची आई विधवा आहे ती आणि ज्ञानेश्वर मागील अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत त्यामुळे दोघांमध्ये चांगली ओळख होती. आईचा ज्ञानेश्वरवर विश्वास होता आणि त्यामुळे मुलीला त्याच्यासोबत फिरण्यासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे मुलीने शाळेत सोडण्यासाठी ज्ञानेश्वर याला बोलवलं आणि त्याने देखील मी शाळेत सोडतो म्हणून सांगून तिला डीपी रोडवर घेऊन गेला. मात्र शाळेत न सोडताच गाडी डीपी रस्त्यावर थांबवली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
advertisement

आईला मुलीने कधी सांगितलं? 

मुलगी शाळेत पोहोचली की नाही याची माहिती घेत असताना ती शाळेत सात वाजताच्या ऐवजी साडेसात वाजता पोहोचली होती. त्यानंतर मुलगी घरी आल्यावर आईने अर्धा तास का उशीर झाला याची माहिती मुलीला विचारली आणि त्या मुलीने घाबरत उत्तर दिली. यावरून तिच्या आईच्या संशय वाढला आणि आईने थेट पोलिसात तक्रार दाखल केली . आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्स अंतर्गत गुन्हा दाखल करणे केलाय आणि ज्ञानेश्वर रायरीकर याला अटक देखील केली आहे.
advertisement

नागरिकांमधून संताप

पोलिसांमध्ये जेव्हा या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली, तेव्हा घटनेचं गांभीर्य पाहता तातडीनं त्यांनी तपास सुरू केला आणि आरोपीला अटक केली. ज्यानंतर या संपूर्ण भागामध्ये नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात आला. त्यातही ओळखीच्या व्यक्तींकडून होणाऱ्या अत्याचारांची प्रकरणं पाहता पालकांच्या मनात भीती वाढली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
विधवा आईचा मित्रच निघाला नराधम! शाळेत सोडतो म्हणाला अन् पुण्यात चिमुरडीवर केला पाशवी अत्याचार
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement