advertisement

जुन्या कारवाईचा राग; तरुण आला कात्री काढली अन् ..कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसासोबत पुण्यात धक्कादायक घडलं

Last Updated:

हर्षल सुपेकर याने तिथे येऊन अन्सारी यांच्यावर अचानक कात्रीने हल्ला केला. अन्सारी यांना जखमी करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

वाहतूक पोलिसासोबत पुण्यात धक्कादायक घडलं (प्रतिकात्मक फोटो)
वाहतूक पोलिसासोबत पुण्यात धक्कादायक घडलं (प्रतिकात्मक फोटो)
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता अशीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात ताथवडे येथील भुयारी मार्ग परिसरात मंगळवारी सायंकाळी कर्तव्य बजावणाऱ्या एका वाहतूक पोलिसावर कात्रीने भीषण हल्ला करण्यात आला. जुन्या वाहतूक कारवाईचा राग मनात धरून एका माथेफिरूने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल मोहम्मद अन्सारी (वय ४२) हे वाहतूक पोलीस मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास ताथवडे अंडरपास जवळ वाहतूक नियमन करत होते. यावेळी संशयित आरोपी हर्षल सुपेकर याने तिथे येऊन अन्सारी यांच्यावर अचानक कात्रीने हल्ला केला. अन्सारी यांना जखमी करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अन्सारी यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
advertisement
कारवाईचा राग अन् सूडाची भावना
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, काही दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसानी हर्षल सुपेकर याच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली होती. या कारवाईचा प्रचंड राग त्याच्या मनात होता. याच रागातून त्याने अन्सारी यांना लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तातडीने हालचाली करत आरोपीच्या वडिलांना ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपी हर्षलचा शोध सुरू आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाकड पोलीस ठाणे आणि रुग्णालयात धाव घेऊन अन्सारी यांच्या तब्येतीची विचारपूस केली. भररस्त्यात पोलिसावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
जुन्या कारवाईचा राग; तरुण आला कात्री काढली अन् ..कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसासोबत पुण्यात धक्कादायक घडलं
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement