advertisement

Raj Thackeray : 'अजित पवार पुण्यात नसतानाही धरण एवढी...' राज ठाकरेंचा अजित पवारांना चिमटा

Last Updated:

Raj Thackeray : पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.

राज ठाकरेंचा अजित पवारांना चिमटा
राज ठाकरेंचा अजित पवारांना चिमटा
पुणे : गेल्या चार ते 5 दिवसांपासून पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं. खडकवासला धरणातून हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्यामुळे शहरातील अनेक नागरी वसाहतींमध्ये पाणी शिरलंय. तर पुण्याचा प्रसिद्ध भिडे पुलही सकाळपासून पाण्याखाली आहे. अतिवृष्टीचा पाऊस आणि नदीला सोडण्यात आलेले पाणी यामुळे पुणेकर त्रस्त झालेत. दरम्यान, पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे रविवारपासून पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी पुण्यातील पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेतले.
राज ठाकरेंचे सरकारला सवाल
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुणे दौरा केला. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खडे बोल सुनावले आहे. पुण्यात ज्यांच्या घरात पाणी शिरलं आहे. त्यांच्या अंगावर फक्त एक कपडा शिल्लक आहे. आता रोगराई पसरेल त्याकडे कोण बघणार, एक अधिकारी निलंबित करुन प्रश्न सुटत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांनाच यात लक्ष घालावं लागेल, असे राज ठाकरे म्हणाले.
advertisement
राज ठाकरे यांचा अजित पवार यांना टोला
पुण्यासारख्या शहरांसाठी सर्व राजकीय पक्षांनी आपापसातले हेवेदावे सोडून एकत्र यायला हवे. सर्वांनी यात जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचे आहे. एखादा प्रकल्प आणायचा असेल तर सर्वांशी चर्चा का केली जात नाही? एकट्या पक्षाच काम नाही. दोन उपमुख्यमंत्री आहेत, एक तर पुण्यातीलच आहे. ते या ठिकाणी नसतानाही धरणात पूर आला. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? असा प्रश्नही राज ठाकरेंनी यावेळी केला.
advertisement
टाऊन प्लॅनिंग नाही : राज ठाकरे
पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. टाऊन प्लॅनिंग होत नाहीय म्हणून या सगळ्या गोष्टी होतात. एकाचेही लक्ष नाही. जोपर्यंत सगळ्या यंत्रणा एकत्र बसणार नाही. तोपर्यंत काही होणार नाही. फक्त नुकसान होणार आहे. कुठली यंत्रणा काय करते हे दुसऱ्या यंत्रणेला माहिती नाही. तुमचं नुकसान सरकारने भरून दिलं पाहिजे. मी संबंधित लोकांशी बोलेल आणि तुम्हाला कळवेल, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Raj Thackeray : 'अजित पवार पुण्यात नसतानाही धरण एवढी...' राज ठाकरेंचा अजित पवारांना चिमटा
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement