Pune Shocking : महाशिवरात्रीला हरिश्चंद्रगडावर रडारड; देवाचं दर्शन घेऊन पायउतार होताच घात झाला
Last Updated:
Harishchandragad Accident News : हरिश्चंद्रगडावर दर्शनासाठी गेलेल्या व्यक्तीसोबत एक भयानक घात झालेला आहे. नेमकं काय घडलं आणि पुढे काय घडलं याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पुणे : हरिश्चंद्रगड गडावर वर्षेभर ट्रेकिंगसाठी अनेकजण जात असतात त्यात काल महाशिवरात्री असल्याने भाविकांची तेथील शिव मंदिरात दर्शनासाठी लगबग सुरु असतेच, दरम्यान काल येथे महाशिवरात्रीच्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडली.
गडावर दर्शनाचा आनंद क्षणात विरला
ओतूर परिसरातील घोडेगाव येथील सुरेश डामसे (वय 35) यांचा गड उतरताना अपघाती मृत्यू झाला. रविवारी सकाळी त्यांनी गडावरील मंदिरात दर्शन घेतले होते. दर्शन आटोपल्यानंतर ते जुन्नर दरवाजा मार्गाने खाली उतरत होते.
दरम्यान उताराच्या वाटेवर चालत असताना डोंगरावरील एक मोठा दगड अचानक निसटला. हा दगड थेट त्यांच्या डोक्यावर येऊन आदळला. जोरदार धक्का बसल्यामुळे सुरेश डामसे खाली कोसळले आणि काही क्षणांतच बेशुद्ध झाले. सोबत असलेल्या इतर भाविकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
advertisement
महाशिवरात्रीमुळे गडावर भाविकांची मोठी गर्दी होती. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. डोंगराळ भागात सैल दगडांमुळे अशा प्रकारच्या दुर्घटना घडू शकतात त्यामुळे गड चढ-उतार करताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 9:35 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Shocking : महाशिवरात्रीला हरिश्चंद्रगडावर रडारड; देवाचं दर्शन घेऊन पायउतार होताच घात झाला








