Pune Rapido News: AC साठी एक्स्ट्रा चार्ज! रॅपिडो चालकाचा मनमानी कारभार

Last Updated:

ऑनलाईन कॅब सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या कॅबमधून प्रवास करणाऱ्या पुणेकरांना ड्रायव्हर्सच्या मनमानीचा फटका बसत आहे.

Pune Rapido News: AC साठी एक्स्ट्रा चार्ज! रॅपिडो चालकाचा मनमानी कारभार
Pune Rapido News: AC साठी एक्स्ट्रा चार्ज! रॅपिडो चालकाचा मनमानी कारभार
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन कॅब सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांविरोधातला वाद चांगलाच चर्चेत आला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा वाद चांगलाच चर्चेत आला होता. आता अशातच पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे. ऑनलाईन कॅब सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या कॅबमधून प्रवास करणाऱ्या पुणेकरांना ड्रायव्हर्सच्या मनमानीचा फटका बसत आहे. हिवाळ्याच्या दिवसांतही, भरदुपारी उन्हाचे चटके बसत आहेत. उन्हाचे चटके बसत असल्यामुळे प्रवासी कॅबमधील एसी सुरू करण्याची मागणी करतात. तेव्हा ड्रायव्हर्सकडून जादा पैशांची मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पुण्याच्या सिंहगड रोडवरील एका रहिवाश्याने या संदर्भात आपला अनुभव सांगितला. त्यांनी नऱ्हे या ठिकाणावरून रॅपिडो कॅब बुक केली होती. त्यांचे प्रवासाचे भाडे 145 रुपये असताना चालकाने एसी सुरू करण्यासाठी थेट प्रति किलोमीटर 30 रुपये जादा भाडे मागितले. प्रवाशाने याला नकार दिला असता, चालकाने तक्रारीची भीती न बाळगता एसी बंदच ठेवला. असाच काहीसा प्रकार आणखी एका प्रवाशासोबतही घडला. पुणे रेल्वे स्टेशनला जात असताना चालकाने त्यांना सांगितले की, सकाळी 11 वाजेपूर्वी एसी लावला जात नाही आणि लावायचा असल्यास 25 रुपये प्रति किलोमीटर अतिरिक्त भाडे द्यावे लागतील.
advertisement
सर्व ऑनलाईन कॅब सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांना पुणे आरटीओने यापूर्वीच नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, अनेक चालकांपर्यंत हे नियम पोहोचलेच नाहीत किंवा ते जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. भारतीय गिग वर्कर्स फ्रंटने यावर चालकांचे समुपदेशन सुरू असल्याचे म्हटले आहे. कॅब चालकांच्या मते, मीटरप्रमाणे मिळणारे भाडे परवडणारे नसल्याने ते अशा मार्गांचा अवलंब करत आहेत. मात्र, यामुळे प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होत आहे. यासंदर्भात रॅपिडोच्या सूत्रांनी माहिती दिली की, जर प्रीमियम किंवा एसी कॅब असेल, तर प्रवाशाच्या सांगण्यांनुसार एसी सुरू करणे बंधनकारक आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Rapido News: AC साठी एक्स्ट्रा चार्ज! रॅपिडो चालकाचा मनमानी कारभार
Next Article
advertisement
Thackeray Alliance NCP Sharad Pawar: मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट
BMC निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट
  • BMC निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट

  • महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युतीवर शिक्कामोर्तब केले असून दुसरीकडे राष्ट्र

  • ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादीतला पेच कुठं अडलाय याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement