Pune : नोकरी मिळाली नाही म्हणून इंजिनिअर बनला चोर, पुण्यातून लॅपटॉप-मोबाईल सगळंच गायब केलं
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
एका उच्चशिक्षित बेरोजगार तरुणाने पुण्यात नोकरी मिळत नसल्यामुळे चोरीचा मार्ग अवलंबला आहे. हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी 29 वर्षांच्या निखील खाडे याला अटक केली आहे.
पुणे : एका उच्चशिक्षित बेरोजगार तरुणाने पुण्यात नोकरी मिळत नसल्यामुळे चोरीचा मार्ग अवलंबला आहे. हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी 29 वर्षांच्या निखील खाडे याला अटक केली आहे. निखीलकडून पोलिसांनी 10 मोबाईल फोन आणि 2 लॅपटॉप जप्त केले आहेत. निखील दोन महिन्यांपूर्वी नोकरीच्या शोधात पुण्यात आला होता, पण त्याला काम मिळालं नाही. त्यामुळे त्याने पीजीमध्ये राहणाऱ्या मुलांचे मोबाईल आणि लॅपटॉप चोरायला सुरूवात केली.
निखील खाडे यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसदचा रहिवासी आहे. निखीलने शेअर बाजारात पैसे लावले होते, तसंच त्याने काही लोकांकडून उधारीवरही पैसे घेतले. जेव्हा त्याला नोकरी मिळाली नाही आणि पैशांची गरज वाढली, तेव्हा त्याने चोरी करायला सुरूवात केली, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
बेरोजगारीमुळे झाला चोर
एका पीजीमधून मोबाईल आणि लॅपटॉप चोरी झाल्याप्रकरणी निखील आरोपी असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, यानंतर पोलिसांनी हिंजवडीच्या साखरे चौक भागातून निखीलला अटक केली. तपास केल्यानंतर निखीलकडून चोरीचा एक मोबाईल फोन जप्त केला. तसंच आतापर्यंत 10 मोबाईल आणि 2 लॅपटॉप चोरी केल्याचं निखीलने कबूल केलं आहे.
advertisement
पोलिसांनी आरोपीकडून चोरीचं सामान जप्त केलं आहे, तसंच पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ यांच्या टीमने या प्रकरणाचा तपास केला. या घटनेनंतर पुन्हा एकदा बेरोजगारीचा मुद्दा समोर आला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
February 14, 2025 11:31 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : नोकरी मिळाली नाही म्हणून इंजिनिअर बनला चोर, पुण्यातून लॅपटॉप-मोबाईल सगळंच गायब केलं